Download App

Video: अर्थसंकल्पाचा हलवा पिछड्या वर्गाला पाहायलाही मिळाला नाही; लोकसभेत राहुल गांधींचा घणाघात

लोकसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून विरोधी पक्षनेने राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार घणाघात केला आहे.

  • Written By: Last Updated:

Lok Sabha Budget Session : मध्यमवर्गीयांना स्वप्न पडू नयेत, अशी सरकारची इच्छा आहे अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते लोकसभेत बोलत होते. दरम्यान, त्यांनी या देशात 73 टक्के मागास वर्ग आहे. त्यामध्ये दलित, आदिवासी, फिछडा वर्ग आहे. मात्र, नुकताच अर्थसंकल्प सादर झाला. त्याच्या पुर्वसंधेला हलवा वाटला. परंतु, त्यामध्ये एकही ओबीसी, दलित, आदिवासी पाहायला मिळाला नाही असं म्हणत थेट घणाघात केला. (Rahul Gandhi ) तुम्हीच सगळा हलवा खायला लागलात या वर्गाला काही मिळेल की नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामण हसताना दिसल्या त्यावर राहुल गांधी म्हणाले मी गंभीर गोष्ट बोलत असताना तुम्ही हसताय असंही राहुल गाधी यावेळी म्हणाले.

अनिल देशमुखांनीच भेटायला बोलावलं होतं; समीत कदमांनी ती घटना सांगत केला मोठा गौप्यस्फोट

अभिमन्यू

शेतकरी, पेपरफुटी, ‘देशात पसरलेली भीती या विषयावरही राहुल गांधींनी यावेळी सरकारवर जोरदार हमला केला. देशात भीतीचं वातावरण आहे, ही भीती संपूर्ण देशात पसरली आहे. भाजपमधील लोकही घाबरलेले आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. तसंच, देशातील शेतकरी घाबरले आहेत असंही ते यावेळी म्हणाले. तसंच, हजारो वर्षांपूर्वी हरियाणात चक्रव्यूहमध्ये अभिमन्यूची 6 जणांनी हत्या केली होती. तसेच सहाजण आत्ता आहेत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, आरएसएस प्रमुख मोहन भागवत, अजित डोवाल यांची नावही त्यांनी यावेळी घेतली. त्यावर लोकसभा अध्यक्षांनी आक्षेप घेतला.

पेपरफुटीवर शब्द नाही

राहुल गांधी म्हणाले, बजेटमध्ये इंटर्नशिप दिली आहे. मात्र, त्याचा देशातील ९९ टक्के तरुणांना या कार्यक्रमाचा कोणताही लाभ मिळणार नाही असा थेट सुलासा राहुल गांधींनी यावेळी केला. अर्थसंकल्पीय भाषणाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान पेपर फुटीबद्दल काहीही बोलल्या नाहीत. परंतु, पेपरफुटी हा तरुणांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, यावर त्यांनी चकार शब्दही काढला नाही असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

follow us