Download App

Lok Sabha Election 2024 : एबीपी सी वोटरचा ओपिनियन पोल जाहीर, दक्षिणेत भाजपची वाट बिकटच!

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत. एकीकडे भाजपकडून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा आणि रॅली सुरू आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडून न्याय यात्रेमधून सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. यादरम्यान निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा करण्यापूर्वी एबीपी सी वोटर यांचा लोकसभा निवडणुकांबाबतचा ओपिनियन पोल जाहीर केला आहे. या पोलमध्ये देशातील जनतेच्या आगामी निवडणुकांबाबतचा कल समोर आला आहे. काय आहे हा पोल आणि कोणत्या राज्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याचा या फोनमध्ये काय अंदाज बांधण्यात आला आहे पाहूयात…

Ahmednagar Loksabha : निलेश लंके खरंच ‘तुतारी’ फुंकणार का ? राजकारणात काहीही होऊ शकते पण…

या पोलनुसार राजस्थान, गुजरात उत्तराखंड, लड्डाख आणि हिमाचल प्रदेश या सर्व ठिकाणी सर्व जागा भाजप जिंकू शकतो. तर काँग्रेसचे खाते देखील राजस्थानमध्ये उघडू शकणार नाही. असा अंदाज या पोलमध्ये व्यक्त करण्यात आला. तर जम्मू काश्मीर बद्दल सांगायचं झालं तर कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला जनतेचा कसा पाठींबा मिळतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं आहे. या ठिकाणी लोकसभेच्या पाच जागांपैकी भाजपला दोन काँग्रेसला तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. तर हरियाणामध्ये दहा पैकी आठ जागा भाजप दोन काँग्रेस आणि मित्र पक्ष यांना मिळू शकतात.

Loksabha Election : कमलनाथांच्या दबावापुढे काँग्रेस झुकली ! मुलाला लोकसभेचे तिकीट; दुसऱ्या यादीत ओबीसींचे वर्चस्व

तिकडे दक्षिण भारतात मात्र भाजपची वाट यावेळी देखील बिकटच असल्याचं त्या पोलमध्ये दिसत आहे. कारण केरळ, तामिळनाडू सर्व जागा या काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर भाजप या ठिकाणी आपलं खातं देखील उघडू शकणार नाही अशी परिस्थिती असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Ahmednagar : महसूल विभागातील मुघल, ब्रिटीश कालीन पदांची नावे बदलणार; मंत्री विखेंची माहिती

कोणत्या राज्यात काय स्थिती?

राजस्थान- एकुण जागा 25
भाजप – 25
कॉंग्रेस –
इतर –

गुजरात – एकुण जागा 26
भाजप – 26
कॉंग्रेस –
इतर –

उत्तराखंड – एकुण जागा 5
भाजप – 5
कॉंग्रेस –
इतर –

लड्डाख – एकुण जागा 1
भाजप – 1
कॉंग्रेस –
इतर –

हिमाचल प्रदेश- एकुण जागा 4
भाजप – 4
कॉंग्रेस –
इतर –

जम्मू-काश्मीर- एकुण जागा 5
भाजप – 2
कॉंग्रेस – 3
इतर –

हरियाणा – एकुण जागा 10
भाजप – 8
कॉंग्रेस – 2
इतर –

केरळ- एकुण जागा 20
भाजप –
कॉंग्रेस – 20
इतर –

तामिळनाडू- एकुण जागा 39
भाजप –
कॉंग्रेस – 39
इतर –

follow us