Download App

अमित शाहांचा मॉर्फ्ड व्हिडिओ अंगलट; झारखंड काँग्रेसचं ‘सोशल’ अकाउंट बंद

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मॉर्फ्ड केलेला एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. झारखंड काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवरून हा मॉर्फ्ड व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता.

Lok Sabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू आहे. या प्रचारात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. सभा, मेळावे ऑनलाइन होत आहेत. याला लाखालाखांचे व्ह्यूज मिळत आहेत. परंतु, यामध्ये लोकांची दिशाभूल करणाऱ्या कंटेन्टचा प्रचंड मारा सुरू आहे. राजकीय नेत्यांचे व्हिडीओ मॉर्फ्ड करून लोकांची दिशाभूल केली जात आहे. या प्रकारामुळेच झारखंड काँग्रेस अडचणी आली. एक्सने झारखंड काँग्रेसचं अधिकृत अकाउंट बंद केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मॉर्फ्ड केलेला एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. झारखंड काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवरून हा मॉर्फ्ड व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली होती.

Madha Loksabha : देवेंद्र फडणवीसांना पुन्हा धक्का! आणखी एक धनगर नेता शरद पवारांच्या गोटात…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) यांच्या फेक व्हिडीओ (Fake Video) प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे जण आप आणि कॉंग्रेसशीसंबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर या प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरू लागली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली आहे. झारखंड काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष गजेंद्र सिंह यांना समन्स आणि नोटीस बजावण्यात आली. झारखंड काँग्रेसवरील वाढत्या दबावामुळे पोलिसांनी एक्सला आमचं अकाउंट बंद करण्यास सांगितल्याचा दावा त्यांनी केला.

याआधी दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना देखील चौकशीसाठी बोलावलं होतं. यानंतर अहमदाबाद पोलिसांनी कारवाई करत एकाला अटक केली होती. तर त्या अगोदर आसाम पोलिसांनी देखील एकाला ताब्यात घेतलं होतं. त्याच्याजवळ एक लॅपटॉप आणि दोन मोबाइल जप्त करण्यात आले. आसाम पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव रीतोम सिंह आहे.

Amit Shah Fake Video प्रकरणी मोठी कारवाई; आप अन् कॉंग्रेसशी संबंधित दोघांना अटक

अमित शाह यांचा आरक्षणासंबंधीच्या वक्तव्याचा एक बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. त्यावरून अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती.  या व्हिडीओ प्रकरणी भाजपने काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार दाखल केली होती. भाजपने आरोप केला होता की, निवडणुकीला वेगळ्या वळणावर नेण्यासाठी अशा प्रकारे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली होती.

follow us