Download App

केजरीवाल अ‍ॅक्शनमोडमध्ये! भाजपचा रथ रोखण्यासाठी महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात घेणार सभा

इंडिया आघाडीतील (India Alliance) अनेक घटक पक्षांनी आपापल्या राज्यात निवडणूक प्रचाराचे केजरीवाल यांना निमंत्रणे पाठवण्यास सुरुवात केली.

Loksabha Election 2024 : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. निवडणूक प्रचारासाठी जामीन मिळाल्याने केवळ आपचं नाहीतर इंडिया आघाडीतील अनेक घटक पक्षांना बळ मिळालं. जामीन मिळाल्यानंतर केजरीवालांनी आज आपच्या प्रचाराला सुरूवात केली. दरम्यान, आता इंडिया आघाडीतील (India Alliance) अनेक घटक पक्षांनी आपापल्या राज्यात निवडणूक प्रचाराचे केजरीवाल यांना निमंत्रणे पाठवण्यास सुरुवात केली.

अजित दादा जरा थांबा! 4 जूनला कळेल निलेश लंके किस झाड की पत्ती है 

दिल्लीतील लोकसभा उमेदवार कुलदीप कुमार यांच्या प्रचारार्थ आज केजरीवाल यांनी कष्णा नगरमध्ये रोड शो केला. आता इंडिया आघाडीतील समाविष्ट असलेल्या उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांतील प्रभावशाली प्रादेशिक पक्षांनी केजरीवाल यांना निवडणूक प्रचारासाठी निमंत्रणे पाठवली आहे. इतकचं नाही तर निवडणुकीच्या उर्वरित तीन टप्प्यांत इंडिया आघाडीने काही संयुक्त रॅलीचेही नियोजन केले जात आहे. त्यामध्ये केजरीवाल यांचा सक्रिय सहभाग असणार आहे.

विरोधकांना नवी ऊर्जा मिळेल

सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना दिलेल्या जामीनमुळे विरोधकांना बळ मिळालं. ते केजरीवाल यांचा प्रचारकाळात चांगला उपयोग करतील. आपच्या उमेदवारांच्या प्रचारासोबत ते काँग्रेससह अन्य उमेदवारांचा जोरदार प्रचार करणार आहे. पंजाबमध्ये त्यांचा काँग्रेससोबत मुकाबला आहेत. पण हरियाणात युती आहे आणि त्यामुळे ते हरियाणात प्रचारासाठी जाणार हे निश्चित आहे

महाराष्ट्र, युपी, बिहारमध्ये जाणार
केजरीवाल महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंसोबत संयुक्त सभा घेणार असल्याची घोषणा ठाकरे गटाने केली आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशातील सपा आणि बिहारमधील आरजेडी नेतृत्वही केजरीवाल यांना त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमंत्रित करणार आहे.

केजरीवालांनी तुरुंगातून सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रसारमाध्यमांना बोललांना सांगितले की, पुढील 20 दिवस भाजप-मोदींच्या विरोधात जोरदार प्रचारासाठी आपला जीव धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे जाहीर केले.

दरम्यान काँग्रेसचे तीन प्रमुख नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी अनेक राज्यांत सभा घेतल्या. आता केजरीवाल देखील भाजपचा रथ रोखण्यासाठी ठिकाणी सभा घेणार आहेत. त्यामुळं या निवडणुकीत केजरीवाल आपला करिश्मा दाखवणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us