Lok Sabha Election Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. यानंतर लगेचच विविध संस्थांचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. या एक्झिट पोलमध्ये देशात एनडीए आघाडी हॅटट्रीक करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वतील एनडीएने या निवडणुकीत चांगली कामगिरी केली. मात्र इंडिया आघाडीनं कडवं आव्हान दिलं. परंतु, काही राज्यात काँग्रेसला जोरदार झटका बसताना दिसत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचं टेन्शन वाढलं आहे. इंडिया टिव्ही-सीएनएक्सनुसार छत्तीसगड, मध्य प्रदेश, पुदुच्चेरी, आंध्र प्रदेश, राजस्थान, ओडिशा या राज्यांत काँग्रेसला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. या राज्यात पक्षाला एकही जागा मिळणार नाही असा अंदाज या एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे.
Lok Sabha 2024 : PM मोदी, अखिलेश अन् राहुल.. पाच वर्षांत कुणाची संपत्ती किती वाढली?
लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर देशात सात टप्प्यात मतदान घेण्यात आल. आज शनिवारी मतदानाचा अखेरचा टप्पा होता. या टप्प्यातील मतदान सायंकाळी सहा वाजता संपलं. त्यानंतर थोड्याच वेळात एक्झिट पोलचे आकडे जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेतृत्वातील एनडीए आघाडी पुन्हा चांगली कामगिरी करताना दिसत आहे तर विरोधी इंडिया आघाडीही जोरदार टक्कर देताना दिसत आहे.
2019 मध्ये निकालाआधी जे एक्झिट पोल जाहीर केले होते ते खरे ठरले होते. या एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीचा विजय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर मतमोजणी झाली आणि हा अंदाज खरा असल्याचे सिद्ध झाले होते. या निवडणुकीत एकट्या भाजपने 303 जागा मिळवल्या होत्या तर एनडी आघाडीला एकूण 353 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला फक्त 52 जागा मिळाल्या होत्या. तर पूर्ण युपीए आघाडीला 91 जागा मिळाल्या होत्या. 2014 मधील निवडणुकीत भाजपला एकूण 282 जागा मिळाल्या होत्या.
Loksabha Election 2024 : वर्धा लोकसभेमध्ये पुन्हा ‘कमळ’ फुलणार की ‘तुतारी’ वाजणार?