Lok Sabha Election 2024 : राजकारणात महिलांचं प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी राजकीय (Lok Sabha Election 2024) पक्षांकडून केले जात असलेले दावे अतिशय पोकळ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील पहिल्या दोन टप्प्यातच याचा प्रत्यय आला आहे. दोन टप्प्यातील 2 हजार 823 उमेदवारांपैकी फक्त 235 म्हणजेच आठ टक्के महिला उमेदवार रिंगणात होत्या. महिलांचं घटतं प्रतिनिधित्व राजकीय विश्लेषकांसाठी काळजीत टाकणारं ठरलं आहे.
निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील एकूण 135 महिला उमेदवारांपैकी तब्बल 76 महिला उमेदवार एकट्या तामिनाडूमधील होत्या. तर दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक 24 महिला उमेदवार केरळ राज्यात होत्या. या दोन्ही टप्प्यात भारतीय जनता पार्टीने अन्य पक्षांच्या तुलनेत महिला उमेदवारांना जास्त संधी दिली. या दोन्ही टप्प्यात भाजपने एकूण 69 महिला उमेदवारांना तिकीट दिले तर काँग्रेस पक्षाने 44 महिला उमेदवारांना संधी दिली.
Loksabha Election 2024 : मतदानाआधीच भाजपने खातं उघडलं; सुरत मतदारसंघात ‘कमळ’ फुललं..
मागील वर्षात ज्या 52 देशांमध्ये निवडणुका झाल्या त्यातील सहा देश असे आहेत जिथे पाच पेक्षा कमी महिला खासदार आहेत. ओमान देशात तर एकही महिला निवडून आलेली नाही. मागील एक वर्षाच्या काळात संसदेतील महिलांच्या भागीदारीत काहीच सुधारणा झालेली नाही. जगभरात महिलांच्या राजकारणातील प्रतिनिधीत्वाबाबतही उदासिनता दिसून येते. राजकीय पक्ष शक्यतो महिलांना उमेदवारी देण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत, हेच यावरून सिद्ध होत आहे.
भारताचा विचार केला तर परिस्थिती फार काही वेगळी नाही. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत 78 महिला उमेदवार निवडणूक जिंकून संसदेत पोहोचल्या होत्या. यातील 12 महिला अशा होत्या ज्यांनी तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा निवडणूक जिंकली आहे. भाजप नेत्या मेनका गांधी रेकॉर्ड 8 वेळा निवडणूक जिंकून संसदेत पोहोचल्या होत्या. त्यामुळे भारतीय राजकारणातही महिलांची स्थिती फार काही वेगळी नाही, असेच म्हणावे लागेल.
Madha Lok Sabha : धैर्यशील मोहितेंना माढा अवघडच, कारणेही अनेक; निंबाळकरांची बाजू तगडी