Download App

PM मोदींचं मंदिर, घराच्या भिंतींवर लिहिलं ‘मोदी बाबा महान’; मोदींच्या जबरा फॅनचा किस्साच खास

Lok Sabha Election : सध्या निवडणुकांचा काळ आहे. सगळीकडे फक्त निवडणुकीच्याच चर्चा आहेत. राजकीय पक्ष नेतेमंडळी, मंत्री, पदाधिकारी आणि कार्यकर्ते झाडून सगळे कामाला लागले आहेत. काहीही करून निवडणूक जिंकायचीच असा त्यांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे सर्वसामान्य जनता आहे. त्यांनाही आपला नेता पुन्हा विजयी व्हावा असे वाटणे सहाजिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता तर जबरदस्त आहे. मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावं अशी अनेकांची इच्छा आहे. यासाठी लोकं आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. कर्नाटकात असाच एक जबरा फॅन आहे. अरुण वर्नेकर असं त्याचं नाव. या बहाद्दरानं पंतप्रधान मोदींचं मंदिर बांधलं आहे. इतकच नाही तर मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी प्रार्थना करत आपल्या हाताचं एक बोट कापत देवीला अर्पण केली.

या प्रकाराची राज्यभरात मोठी चर्चा होत आहे. अरुण वर्नेकर यांनी पीएम मोदींचे एक मंदिर बांधले आहे. ते या ठिकाणी नित्यनेमाने पूजा करतात. त्यांनी आपल्या घरातील भिंतींवरही मोदी बाबा तिसऱ्या वेळेस पंतप्रधान बनतील. मोदी बाबा सबसे महान अशी वाक्ये लिहिली आहेत. यानंतर वर्नेकर यांनी माध्यमांशीह संवाद साधला. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर चीन आणि पाकिस्तानकडून भारताला होणारा त्रास कमी झाल्याचे वर्नेकर म्हणतात.

Bhiwandi Loksabha 2024 : महाविकास आघाडीत बंडाचे वारे; भिवंडीत राष्ट्रवादीविरोधात काँग्रेस नेत्यांनी ठोकला शड्डू

वर्नेकर म्हणाले, आधी काश्मिरातून नेहमीच दहशतवादी हल्ले आणि जवानांच्या मृत्यूच्या बातम्या येत असायच्या. आता मात्र या राज्यात शांतता आहेत. देशाच्या विकासासाठी मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत ही देशाची गरज आहे. अरुण वर्नेकर आधी मुंबईतील चित्रपट सृष्टीत काम करत होते. आता ते कर्नाटकात आहेत. याआधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी आपल्या हाताचे बोट कापण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्यानंतर 4 जून रोजी निकाल घोषित केले जाणार आहेत. या निवडणुकांची तयारी सर्व राजकीय पक्षांकडून केली जात आहे. राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग दिला जात आहे. स्टार प्रचारकांची यादी घोषित झाली आहे. यानंतर या प्रचारकांच्या सभा आणि रॅलींचे नियोजन केले जात आहे.

Karnataka : CM सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात? ‘त्या’ गुप्त बैठकीनंतर DK थेट दिल्लीला रवाना

follow us