नवी दिल्ली : संसदीय लोकशाहीतील आजचा दिवस गौरवशाली आणि गौरवाचा दिवस आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नवीन संसदेत हा शपथविधी सोहळा होत आहे. आतापर्यंत जुन्या संसदेच्या इमारतीत हा सोहळा होत होता. या महत्त्वाच्या दिवशी मी सर्व नवनिर्वाचित खासदारांचे मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. तिसऱ्या टर्ममध्ये पूर्वीपेक्षा 3 पट जास्त काम करू अशी गॅरंटीही मोदींनी (Narendra Modi) संसदेच्या अधिवेशनापूर्वी देशवासियांना दिली. विरोधक अधिवेशनकाळात अर्थपूर्ण चर्चा करतील अशी आशा आहे. देशाला चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे. विरोधक लोकशाहीची प्रतिष्ठा राखतील, अशी आशा आहे. (PM Modi Speech Before Parliament 18 Special Session)
Parliament Session: संसदेचा पहिला दिवस विरोधक गाजवणार? 10 दिवसांत काय काय होणार?
काय म्हणाले मोदी?
अधिवेशानापूर्वी संबोधित केलेल्या भाषणात मोदी म्हणाले की, ‘सर्वोत्तम भारत’, ‘विकसित भारत’ बनवण्याच्या संकल्पाने आज 18वी लोकसभेची सुरुवात होत आहे. नवीन उंची, नवा वेग आणि नवा उत्साह गाठण्याची ही संधी आहे. 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याच्या उद्देशाने आजपासून 18 वी लोकसभेला सुरुवात होत आहे. जगातील सर्वात मोठी निवडणूक अत्यंत भव्य, दिमाखदार पद्धतीने पार पाडली ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असून, या कुंभमेळ्यात 65 कोटींहून अधिक मतदारांनी मतदानात भाग घेतल्याचे मोदी म्हणाले. आम्हाला तिसऱ्यांदा निवडून देऊन देशातील जनतेने त्यांचे धोरण, जिद्द आणि समर्पणाला मान्यता दिली आहे. सरकार चालवायला बहुमत हवे असते पण, देश चालवायचा असेल तर सर्वांची सहमती आवश्यक असते. त्यामुळे सर्वांच्या सहमतीने देशाला पुढे न्यायचे असून, सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे. 18व्या लोकसभेत तरुणांची संख्या चांगली आहे.
भाजपचे भर्तृहरि महताब लोकसभेचे प्रोटेम स्पीकर, राष्ट्रपतींकडून नियुक्ती, काय असेल पॉवर?
18 मुल्याचे महत्व अधिक
आजपासून 18 लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात होणार आहे. त्याआधी मोदींनी भारतीय संस्कृतीत 18 मूल्याचे खूप सात्विक मूल्य असून, गीतेतही 18 अध्याय असून, यात कर्तव्याचा संदेश देण्यात आला आहे. पुराणांची संख्याही 18 असून, देशवासियांना वयाच्या 18 व्या वर्षी मतदानाचा अधिकार मिळतो असे मोदी म्हणाले. स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा सरकारची सेवा करण्याची संधी दिली आहे, जी 60 वर्षांनंतर आली आहे. त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.
यावेळी मोदी यांनी 25 जून 1975 ला आणीबाणी लागू केल्याचाही उल्लेख केला. उद्या 25 जून आहे. भारतीय संविधान आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी 25 जून हा दिवस अविस्मरणीय आहे. या दिवशी भारताच्या लोकशाहीला काळीमा फासली गेली. भारताची राज्यघटना पूर्णपणे नाकारली गेली हे भारताची नवीन पिढी विसरणार नाही.
मोदींसह 280 खासदार घेणार शपथ
पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, शिवराज चौहान, मनोहर लाल खट्टर, इतर केंद्रीय मंत्र्यांसह 280 खासदार शपथ घेणार असून मंगळवारी (दि.25) 264 नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. ही शपथ राज्यनिहाय दिली जाणार असून, प्रोटेम स्पीकर भर्तृहरि हरी महताब खासदारांना शपथ देतील.