भाजपचे भर्तृहरि महताब लोकसभेचे प्रोटेम स्पीकर, राष्ट्रपतींकडून नियुक्ती, काय असेल पॉवर?
Bhartrhari Mahtab : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी 18 व्या लोकसभेसाठी भाजप खासदार भर्तृहरि महताब (Bhartrhari Mahtab) यांची प्रोटेम स्पीकर (Protem speaker) म्हणून नियुक्ती केली आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
भाजपचे भर्तृहरि महताब लोकसभेचे प्रोटेम स्पीकर, राष्ट्रपतींकडून नियुक्ती
काही दिवसांपूर्वी केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर नवीन संसदेचे पहिले अधिवेशन लवकरच सुरू होणार आहे. हे अधिवेशन 3 जुलैपर्यंत चालणार आहे. यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा अध्यक्षांच्या निवडीपर्यंत पीठासीन अधिकारी म्हणून महताब हे कर्तव्य बजावतील.
President is pleased to appoint Shri Bhartruhari Mahtab, Member, Lok Sabha as Speaker Protem under Article 95(1) of the Constitution to perform the duties of Speaker till election of the Speaker.
President is also pleased to appoint Shri Suresh Kodikunnil, Shri Thalikkottai…— Kiren Rijiju (@KirenRijiju) June 20, 2024
हाकेंची प्रकृती पाहून वडेट्टीवारांना अश्रू, जरांगे म्हणाले, ‘मराठ्यांची इतकी मुलं गेली तेव्हा…’
किरेन रिजिजू यांनी एक्स पोस्ट करत लिहिलं की, राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांनी लोकसभा सदस्य भतृहरि महताब यांची अनुच्छेद 95(1) च्या अंतर्गत प्रोटेम स्पीकर नियुक्त केली. ते अध्यक्षांची निवड होईपर्यंत या पदावर राहतील. सदस्यांना पदाची शपथ देण्याच्या कामी प्रोटेम स्पीकर यांना मदत करण्यासाठी सुरेश कोडीकुन्नील, थलीकोट्टई राजुतेवर बाळू, राधा मोहन सिंग, फग्गन सिंग कुलस्ते आणि सुदीप बंदोपाध्याय यांची घटनेच्या कलम 99 अन्वये सदस्यपदी नियुक्ती नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत भतृहरि महताब?
ओडिशाच्या कटक लोकसभा मतदारसंघातून भतृहरि महताब सातव्यांदा खासदार झाले आहेत. भतृहरि हे ओडिशाचे माजी मुख्यमंत्री दिवंगत हरेकृष्ण महाताब यांचे पुत्र आहेत. भतृहरि महताब यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बिजू जनता दल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी कटक मतदारसंघातून बीजेडीचे संतरूप मिश्रा यांचा 57077 मतांनी पराभव केला. 2017 पासून सलग चार वर्षे त्यांना ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
जयराम रमेश यांचा भाजपवर निशाणा
दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भतृहरि महताब यांच्या निवडीवरून भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, संसदीय परंपरेनुसार, सर्व नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांसाठी प्रदीर्घ कार्यकाळ असलेल्या खासदाराची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली जाते. 18 व्या लोकसभेतील सर्वात ज्येष्ठ खासदार कोडीकुन्नील सुरेश (काँग्रेस) आणि वीरेंद्र कुमार (भाजप) आहेत, असं असतांनाही भाजपने भतृहरि महताब यांची नियुक्ती केलेली निुयक्ती ही लोकशाहीचा अपमान आहे, अशी टीका जयराम रमेश यांनी केली.
अधिवेशन कधी सुरू होणार?
18 व्या लोकसभेत भाजप खासदार भतृहरि महताब नवनिर्वाचित खासदारांना प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ देतील. नवनिर्वाचित सदस्य 24-25 जून रोजी शपथ घेतील. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक 26 जून रोजी होणार आहे.