हाकेंची प्रकृती पाहून वडेट्टीवारांना अश्रू, जरांगे म्हणाले, ‘मराठ्यांची इतकी मुलं गेली तेव्हा…’

हाकेंची प्रकृती पाहून वडेट्टीवारांना अश्रू, जरांगे म्हणाले, ‘मराठ्यांची इतकी मुलं गेली तेव्हा…’

Manoj Jarange On Vijay Wadettiwar : कुणबी आणि मराठा एकच असल्याचे सांग मनोज जरांगेंन (Manoj Jarange) ओबीसीतून आरक्षण (OBC reservation) देण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलं. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ लक्ष्मण हाके (Laxman Hake) गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. अशातच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar)आंदोलनस्थळी जाऊन हाकेंची भेट घेतली. त्यांची ढासळलेली प्रकृती पाहून वडेट्टीवारांच्या डोळ्यात पाणी आले. यावर आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली.

पदवीधर निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप? अनिल परबांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप 

मनोज जरांगेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, मराठ्यांची इतकी मुलं गेली. मात्र, त्या विरोधी पक्षनेत्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही आणि आज पाणी आलं. चांगल आहे, असा टोला जरागेंनी लगावला.

पुढं बोलतांना ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील असं म्हणतात की, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करण्याची गरज नाही, आम्ही काय म्हणतोय हे सरकारनं लक्षात घ्यावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री शभुराज देसाई साहेब, आम्ही दिलेली व्याख्या मान्य असेल तर सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा. चंद्रकांतदादा म्हणतात, तसं करू नका. अन्यथा आमची फसवणूक होईल, फसवणूक करा, असं जरांगे म्हणाले.

हाच चमत्कार उद्याच्या निवडणुकीत करायचायं; शरद पवारांचं एक विधान अन् दादांना धास्ती 

वेड्यात काढू नका
खोटी अंमलबजावणी करायची असेल तर करू नका. आम्हाला वेड्यात काढू नका. मुंबईत डझनभर सचिव आले होते. तिथं आम्ही व्याख्या लिहून दिली. सुमित भांगे आणि केसरकर होते. मग आता धोका का देताय? असा सवाल करत जरांगेंनी आरक्षण ५० टक्क्यांच्या आत असावे, कारण वरचं टीकणार नाही, असं म्हटलं.

ओबीसी आंदोलनकर्ते आमचे विऱोधक नाही. त्यांना आमचा विरोध नाही. पण, मराठा नेत्यांना लाज वाटली पाहिजे. तुमच्या लेकरांना आरक्षण नाही. त्यांना आरक्षण असून ते किती लढतात पाहा… तुम्हाला विधानसभा कळेल. तुम्हाला मराठ्यांची किती गरज आहे? 13 जुलैपर्यंत आम्ही थांबू. 14 जुलैनंतर काय करायचे ते करू, असा इशाराही जरागेंनी दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज