Download App

BJP Candidate List : अभिनेत्री कंगना रणौत हिची अखेर राजकारणात एंट्री, भाजपने दिली लोकसभेची उमेदवारी

  • Written By: Last Updated:

BJP Candidate List : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून आज पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या 111 उमेदवारांच्या यादीत भाजपने अभिनेत्री कंगना रणौत  (Kangana Ranaut) देखील उमेदवारी जाहीर केली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडीमधून कंगना रणौत उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन कंगनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान, त्यांचा राजकीय अंत जवळ; मिटकरींचा पलटवार 

गेल्या अनेक दिवसांपासून कंगना निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. कंगना रणौत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कट्टर समर्थक आहे. गेल्या वर्षी कंगनाने राजकारणात उतरण्याचे संकेत दिले होते. भगवान श्रीकृष्णाने आशिर्वाद दिला तर आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असं म्हणत तिने आपली खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यातच आता कंगनाला भाजपने उमेदवारी घोषित केली.

मंडीमधूल लढणार कंगना

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर अनेक कलाकारांच्या नावाची लोकसभेसाठी चर्चा होती. त्यात कंगणाचं नाव आघाडीवर होता. कंगनाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे ती खूप सतत चर्चेत असायची. त्यांची भूमिका भाजपला पुरक असल्यानं कंगणाला भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी चर्चा सुरू होती. अखेर आज या चर्चांना विराम मिळाला. हिमाचल प्रदेशातील मंडीमधून कंगना रणौत उमेदवारी देण्यात आली आहे.

Loksabha Election : सोलापूरात प्रणिती शिंदेविरुद्ध राम सातपुते ‘रणसंग्राम’, भाजपची दुसरी यादी जाहीर 

हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून कंगना राणावला उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा सिंह सध्या मंडी लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार आहेत. या जागेवर कंगनाला उमेदवारी देऊन भाजपने मोठी खेळी खेळली आहे.

तर नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले उद्योगपती नवीन जिंदाल यांनाही भाजपने हरियाणातून लोकसभेसाठी रिंगणात उतरवले आहे.

अरुण गोविल यांनाही तिकीट

रामायण मालिकेत रामची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनाही तिकीट देण्यात आले आहे. अरुण गोविल मेरठमधून निवडणूक लढवणार आहेत.

महाराष्ट्रातीतून तिघांना उमेदवारी जाहीर
याशिवाय, भाजपने महाराष्ट्रातून तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. सुनील मेंढे यांना भंडारा-गोंदिया मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. यासोबतच भाजपने गडचिरोली-चिमूरमधून अशोक महादेवराव नेते आणि सोलापूरमधून राम सातपुते यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे.

 

follow us