London : लंडनमधून (London) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका कार्यक्रमाप्रसंगी एका व्यक्तीने उपस्थित लोकांसह पोलिस अधिकाऱ्यांवर तलवार अन् चाकून हल्ला (Sword Attacks) केल्याची घटना घडली आहे. या व्यक्तीने अनेक लोकांवर जीवघेणा हल्ला करुन जखमी केले आहे. दरम्यान, पोलिसांनी या 36 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
Police and emergency services are in Hainault at a serious incident in which a man with a sword has been arrested.
Read and share our latest update below.
We do not believe there is any ongoing threat to the wider community – this incident does not appear to be terror-related. pic.twitter.com/M2ljxeBu32
— Redbridge MPS (@MPSRedbridge) April 30, 2024
मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या माहितीनूसार ही घटना हैनॉल्टजवळ सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत अनेक लोकं जखमी झाले असून या घटनेचा दहशतवादी हल्ल्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
लष्काराच्या साथीने ‘पुनीत बालन ग्रुप’ चा अनोखा उपक्रम; साकारले देशातील पहिले संविधान उद्यान
दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये सदरील व्यक्तीच्या हातात तलवार असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. याचवेळी आजूबाजूच्या परिसरात पोलिस अधिकारी, अग्निशमन दल, आणि रुग्णवाहिका असल्याचं दिसून येत आहे. या घटनेनंतर मेयर सादिक खान यांनी पोलिस प्रशासनाने सतर्कता बाळगल्याने आभार मानले असून काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान ऋषि सुनक यांनी चाकूहल्ल्याप्रकरणी कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.