लष्काराच्या साथीने ‘पुनीत बालन ग्रुप’ चा अनोखा उपक्रम; साकारले देशातील पहिले संविधान उद्यान

लष्काराच्या साथीने ‘पुनीत बालन ग्रुप’ चा अनोखा उपक्रम; साकारले देशातील पहिले संविधान उद्यान

Punit Balan Group make Constitution Garden with Army : पुण्यातील ‘पुनीत बालन ग्रुप’ ( Punit Balan Group ) उद्योगांसह त्यांच्या विविध सामाजित उपक्रमांसाठी देखील तेवढाच चर्चेत असतो. जनजागृती असो वा समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणं असो ‘पुनीत बालन ग्रुप’नेहमीच अग्रेसर असतो. असाच एक अनोखा उपक्रम यावेळी देखील या समुहाने केला आहे. हा उपक्रम म्हणजे ‘पुनीत बालन ग्रुप’ने लष्कराच्यासोबतीने ( Army ) देशातील पहिले संविधान उद्यान ( Constitution Garden ) साकारले आहे.

Karmaveerayan: ‘कर्मवीरायण’ मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांच जीवनचरित्र

पुण्यातील लष्कर भागात असलेल्या या संविधान उद्यानात भारतीय ससंदेच्या प्रतिकृत्तीवर राजचिन्ह असलेली तीन सिंहांची प्रतिकृती असून त्यावर संविधान लावण्यात आले आहे. तसेच उद्यानाच्या परिसरात संविधानातील नागरिकांची अकरा कर्तव्ये यांची माहितीही देण्यात आली आहे. भारतीय लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या हस्ते झाले.

माजी मंत्र्याचा डबलगेम! आधी शिंदेंना जय महाराष्ट्र, आता ‘बीड’मध्ये महायुतीला धक्का

यावेळी ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन, माणिकचंद ऑक्सिरीच व ‘माणिकचंद ग्रुप’च्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल-बालन आणि दक्षिण महाराष्ट्र व गोवा उप विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल विक्रांत नाईक हे यावेळी उपस्थित होते. भारतीय संविधानाने आपल्याला मुलभूत अधिकार आणि कर्तव्ये दिली आहेत.

T20 World Cup : टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? हार्दिकला धक्का, ‘या’ नावाची जोरदार चर्चा

देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र करायचे आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने संविधानात दिलेली कर्तव्ये पार पाडली. तर ते महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन जनरल ऑफिसर, कमांडिंग इन चिफ दक्षिण कमांड लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी केले. तसेच संविधान उद्यानासारखे उपक्रम राबविण्याची आवश्यकता असून त्यासाठी सिंग यांनी पुनीत बालन यांचे आभारही व्यक्त केले.

तर उद्योजक पुनीत बालन म्हणाले की, आपला देश ज्या संविधानावर चालतो. त्याचे भारतातील पहिले संविधान उद्यान भारतीय लष्करासमवेत तयार करताना हातभार लागला याचा मनापासून आनंद होतो. या संविधानातील मुलभूत अधिकार आणि आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ नेहमीच अग्रेसर राहील, अशी ग्वाही यानिमित्ताने मी देतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube