LPG Cylinder Price Hike From November 1 : ऐन दिवाळीतच महागाईचा भडका उडाला आहे. 1 नोव्हेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ (LPG Cylinder Price Hike) झालीय. आजपासून तेल विपणन कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात सलग चौथ्या महिन्यात वाढ केलीय. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) किंमतीत प्रति गॅस सिलेंडर सरासरी 62 रुपयांनी वाढ झालीय.
1 नोव्हेंबर 2024 पासून व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. इंडियन ऑइलने 1 नोव्हेंबरपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 62 रुपयांनी वाढ केलीय. त्यामुळे आता दिल्लीत हॉटेल, रेस्टोरंटच्या कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी 1,802 रुपये मोजावे लागतील. मुंबईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1692.50 रुपयांवरून 1754.50 रुपये झालीय.
20 नोव्हेंबरपूर्वीच शरद पवारांना निवडणूक आयोगाकडून दिलासा, ‘तुतारी’ बाबत मोठा निर्णय
दिवाळीतच महागाईचा झटका बसला आहे. आजपासून नोव्हेंबर महिना सुरू आहे. अनेक शहरांमध्ये आज दिवाळी साजरी होतेय. दरम्यान सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आज व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ करून मोठा दणका दिला आहे. याअगोदर खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली होती, त्यानंतर आता गॅसच्या किमती देखील वाढल्या आहेत, यामुळे दिवाळीचा फराळ चांगलाच महागल्याचं दिसतंय.
निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार टिंगरे अडचणीत? पोर्शे कार अपघातातील तरुण -तरुणीचे पालक कोर्टात जाणार
मागील चार महिन्यांमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीमध्ये 150 रुपयांहून जास्त वाढ झालीय. दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर 156 रुपयांनी तर मुंबईत 156.5 रुपयांनी वाढ झालीय. मात्र घरगुती सिलिंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. परंतु व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्यामुळे रेस्टॉरंटमधील जेवणाच्या किंमतीवर नक्की परिणाम होण्याची शक्यता आहे. आज लक्ष्मीपूजन आहे. यादिवशीच पुन्हा महागाईचा भडका उडाल्याचं दिसत आहे. आजपासून व्यावसायिक सिलिंडरसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. मार्च महिन्यापासून घरगुती सिलिंडरच्या दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये मार्च अखेरीस शंभर रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्यानंतर दरवाढ झालेली नाही.