Madhya Pradesh Election : भाजपशासित मध्यप्रदेशात (Madhya Pradesh Election) निवडणुकांचे वारे वेगात वाहत आहेत. राज्यातील चांगले चाललेले सरकार पाडल्याची सल काँग्रेसच्या मनात आहे. आता या पाडापाडीच्या राजकारणाचा बदला घेत भाजपला सत्तेतून बेदखल करण्याचा प्लॅन काँग्रेसने (Congress) आखल्याचे दिसत आहे. यावेळी मध्य प्रदेशात काँग्रेस कर्नाटकचा प्लॅन आजमावण्याचाही विचार करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्यातील निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. काँग्रेसने राज्यातील नागरिकांसाठी ‘कृषक न्याय योजना’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे थकीत वीदबिल माफ करण्यात येईल. दिवसातील बारा तास वीजपुरवठा करण्यासह आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल झालेले खटलेही मागे घेण्यात येतील. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काँग्रेसने ही घोषणा केली आहे.
मुंबईतील ‘INDIA’ च्या बैठकीत ‘आप’ सहभागी होणार? अरविंद केजरीवालांनी स्पष्ट सांगितले
मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार आले तर 1.5 एचपी वीजबिल माफ करण्यात येईल. दोन हॉर्स पॉवरपर्यंतच्या पंपांचे थकीत वीजबिलही माफ करण्यात येईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. आंदोलनातील खटले मागे घेण्यात येतील. तसेच दिवसातील 12 तास वीजपुरवठा करण्यात येईल, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
राज्यात यंदा भाजपसाठी फारसे अनुकूल वातावरण दिसत नाही. त्यामुळेच केंद्रातील वरिष्ठ नेत्यांचे राज्याचे दौरे वाढले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या तीन विश्वासू नेत्यांनी पुन्हा घरवापसी केल्यानेही भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेस नेते अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. मध्य प्रदेशात इच्छुक उमेदवारांची चाचपणीही काँग्रेसने सुरू केली आहे. 90 ते 110 उमेदवारांची पहिली यादी 10 सप्टेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. 2018 मध्ये ज्या 39 जागांवर पराभव झाला होता तेथील उमेदवारांची यादी 17 ऑगस्टल जाहीर केली आहे.
भ्रष्टाचारात भारताचे गृहमंत्रालयच अव्वल! रेल्वे अन् बँक अधिकाऱ्यांचा नंबर दुसरा
मध्य प्रदेशात आम आदमी पार्टीही (AAP) इलेक्शन मोडमध्ये आहे. त्यामुळे काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे. राज्यातील बेरोजगार युवकांना दरमह तीन हजार रुपये मासिक भत्ता, मोफत वीज, मोफत इलाज, मोफत वीजबिल माफ आणि दर्जेदार शिक्षणासह महत्वाची आश्वासने पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिली. पंजाबमध्ये ज्या मोफत योजना आम आदमी पार्टीने सुरू केल्या त्याच धर्तीवर केजरीवाल यांनी मध्यप्रदेशातही मोफत आश्वासने दिली आहेत. आपच्या राज्यातील एन्ट्रीचा जास्त फटका काँग्रेसलाच बसण्याची शक्यता आहे. या राज्यात जर सर्वच मतदारसंघात आम आदमी पार्टीने उमेदवार दिले तर मतविभागणीचा फटका काँग्रेसला जास्त बसण्याची शक्यता आहे.