मुंबईतील ‘INDIA’ च्या बैठकीत ‘आप’ सहभागी होणार? अरविंद केजरीवालांनी स्पष्ट सांगितले

मुंबईतील ‘INDIA’ च्या बैठकीत ‘आप’ सहभागी होणार? अरविंद केजरीवालांनी स्पष्ट सांगितले

Arvind Kejriwal : देशातील विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीची (INDIA Alliance meeting) 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) उपस्थित राहणार की नाही यावर सस्पेन्स होता. यावर अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

INDIA च्या बैठकीला उपस्थित राहणार
अरविंद केजरीवाल म्हणाले की, आप मुंबईत होणाऱ्या INDIA च्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. विरोधी आघाडीची पुढील बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. दरम्यान आघाडीचा एक भाग असलेल्या काँग्रेस आणि आप यांच्यातील वादाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत होत्या. यानंतर ‘आप’ या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी आपला पक्ष बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले.

माणसाने लायकी पाहून बोलावं; पंतप्रधानपदाच्या ऑफरवरून शिरसाटांचं राऊतांवर टीकास्त्र

छत्तीसगडमध्ये ‘काँग्रेस’ विरुद्ध ‘आप’
अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच छत्तीसगडमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. नऊ आश्वसनांची घोषणा करत केजरीवाल यांनी काँग्रेसशी दोन हात करायला तयार असल्याचे सांगितले होते. केजरीवाल म्हणाले की, सरकार बनताच येथील 10 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या दिल्या जातील.

दिल्लीतील लोकसभेच्या सर्व जागा लढवणार
अलीकडेच दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीनंतर अलका लांबा यांनी खळबळजनक वक्तव्य केले होते. काँग्रेसच्या प्रवक्त्या अलका लांबा यांनी आपला पक्ष दिल्लीतील लोकसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याचे सांगून वादाला तोंड फोडले होते.

Vanita Kharat: “मी जितकी हसवते तितकंच…”; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची ‘ती’ पोस्ट चर्चेत!

यानंतर आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका कक्कर म्हणाल्या की, काँग्रेसने दिल्लीत एकट्याने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांच्याशी युती करण्यात काही अर्थ नाही. काँग्रेसनेच ‘आप’शी आघाडी करण्यासाठी संपर्क साधला कारण दिल्लीत त्यांचे अस्तित्व नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube