Download App

महादेव बेटिंग अॅपच्या प्रवर्तकाने CM भूपेश बघेलांना दिले 508 कोटी; ईडीचा खळबळजनक दावा

  • Written By: Last Updated:

Bhupesh Baghel : छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी ईडीने (ED) मुख्यमंत्री भूपेश बघे (Bhupesh Baghel) यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. महादेव बेटिंग अॅपच्या (Mahadev Betting App) प्रवर्तकांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 508 कोटी रुपये दिल्याचे ईडीचं म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असल्याचे ईडीचे सांगितलं. दरम्यान, ईडीने केलेल्या दाव्यांनंतर निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता बळावली आहे.

Urfi Javed : रिल्स बनवणं उर्फीला भोवलं; पोलिसांत गुन्हा दाखल! 

गेल्या काही दिवसांपासून महादेव बेटिंग अॅप आणि त्यासंबंधी ईडीकडून होणार कारवाई चर्चेत आहे. या प्रकरणात अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री ईडीच्या रडारवर आहेत. या प्रकरणी ईडीने गुरुवारी छत्तीसगडमध्ये सर्च ऑपरेशन दरम्यान मोठी कारवाई केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी (2 नोव्हेंबर) ईडीने छत्तीसगडमधील महादेव बेटिंग अॅप प्रकरणात 5 कोटी 39 लाख रुपयांची रोकड जप्त केली. यामध्ये 15.59 कोटी रुपयांची बँक बॅलन्सही गोठवण्यात आली. यात बघेल यांचं नावही समोर आलं.

अटक केलेल्या व्यक्तीने दिली कबुली दिली

ईडीने शुक्रवारी दावा केला की त्यांनी मनी लाँड्रिंगमध्ये गुंतलेल्या व्यक्तीचे बयान नोंदवले आहे. महादेव बेटिंग अॅपच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आतापर्यंत 508 कोटी रुपये दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा तपासाचा विषय असल्याचे ईडीने म्हटले आहे. छत्तीसगड या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनी लाँड्रिंगमध्ये गुंतलेल्या त्याच्याकडून 5.39 कोटी रुपये वसूल केल्यानंतर एजन्सीने असीम दासला अटक केली आहे.

महादेव अ‍ॅपविरोधात चौकशी सुरू

ईडीकडून महादेव ऑनलाइन बेटिंग अॅप आणि त्याच्या प्रवर्तकांविरुद्ध मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत चौकशी सुरू आहे. एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की, असीम दासची चौकशी, त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या फोनची फॉरेन्सिक तपासणी आणि शुभम सोनी (महादेव नेटवर्कच्या उच्चपदस्थ आरोपींपैकी एक) यांनी पाठवलेल्या ईमेलच्या तपासणीत अनेक धक्कादायक आरोप उघड झाले आहेत.

महादेव अॅपचे प्रवर्तक यापूर्वी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना नियमित पैसे देत असल्याचे उघड झाले आहे. तसेच आतापर्यंत सुमारे 508 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.

‘बघेल प्रीपेड मुख्यमंत्री’

याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर हल्लाबोल केला. शाह यांनी बघेल यांना प्रीपेड सीएम म्हटलं होतं. शाह म्हणाले होते की, छत्तीसगडमधील जनतेचे पैसे दिल्ली दरबारात पाठवण्याचे काम बघेल यांनी केले आहे. छत्तीसगडच्या तिजोरीवर दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचा हक्क आहे. मात्र, बघेल यांनी एटीएम बनवून छत्तीसगडची तिजोरी दिल्लीतील भावा-बहिणींच्या चरणी अर्पण केल्याचा आरोप त्यांनी केला.

छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

यापूर्वी या कलाकारांची चौकशी
महादेव बेटिंग अॅप प्रकरणी ईडीने बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यात रणवीर कपूर, श्रद्धा कपूर, हुमा कुरेशी, हिना खान आणि कॉमेडियन कपिल शर्मा या कलाकारांचा समावेश आहे.

Tags

follow us