Urfi Javed : रिल्स बनवणं उर्फीला भोवलं; पोलिसांत गुन्हा दाखल!

Urfi Javed : रिल्स बनवणं उर्फीला भोवलं; पोलिसांत गुन्हा दाखल!

Urfi Javed : पोलिसांच्या गणवेशाचा गैरवापर करुन रिल्स बनवणं अभिनेत्री उर्फी जावेदला(Urfi Javed) चांगलच भोवलं आहे. पोलिसांची बदनामी होईल या उद्देशाने उर्फीसह इतर दोन महिलांनी रिल्स व्हिडिओ व्हायरल केला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांची बदनामी होत असल्याचं दिसून आल्याने उर्फीसह अन्य दोन महिला आणि एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे ऐतिहासिक दुर्गाडी किल्लाच नावावर केला, आरोपीविरुध्द गुन्हा दाखल

नेमकं काय घडलं?
अभिनेत्री उर्फी जावेदसह अन्य दोन महिला आणि इतर पुरुषांनी पोलिसांची बदनामी होईल, या उद्देशाने रिल्स व्हिडिओ बनवला. पोलिसांच्या बदनामीचा हा संबंधित रिल्स व्हिडिओ उर्फीसह तिच्या साथीदारांनी मुंबईतील लोखंडवाला रोड परिसरातील सिल्वर स्प्रिंग अपार्टमेंट परिसरात बनवला होता. हा रिल्स व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला.

नागरिकांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच हा व्हिडिओ खरा वाटला होता. भारतात आणि जगात अपुरे कपडे घातल्यास मुंबई पोलिस महिलांना अटक करतात, असा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आला होता.

Elvish Yadav : एल्विश यादव प्रकरणी ठाकरे गट आक्रमक; अंधारेंचा सीएम शिंदेंना थेट सवाल

नाहक पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी उर्फीसह इतर साथीदारांविरोधात ओशिवारा पोलिस ठाण्यात कलम 171,419, 500,34 नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय?
व्हायरल व्हिडिओमध्ये उर्फी एका कॅफेमधून बाहेर येत असून त्याचवेळी पोलिस पोहोचतात. त्यानंतर महिला पोलिस उर्फीशी बोलते आणि तिला सोबत पोलिस स्टेशनला घेऊन जाण्यास सांगते. उर्फी त्यांना अटक करण्याचे कारण विचारते. याला प्रत्युत्तर म्हणून महिला पोलीस कर्मचारी तिला असे छोटे कपडे घालून फिरत असल्याचे सांगतात. उर्फी उत्तर देते आणि म्हणते की ही तिची इच्छा आहे, असं व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे.

Lok Sabha Election : 2024 साठी खडसेंची मोठी घोषणा! तिकीट मिळाल्यास रावेरमधून लढणार

तसेच पोलीस पुढे उर्फीला सांगतात की, पोलीस स्टेशनला जाऊन तिला जे काही म्हणायचे आहे ते सांग. उर्फीचा चेहरा लटकलेला दिसतो, ती जायला तयार नसतेपोलीस कोणाच्या आदेशावर तिला घेऊन जात आहेत. यानंतर पोलीस तिला पकडून गाडीत बसवतात आणि घेऊन जातात. व्हिडिओमध्ये उर्फी जावेद नाराज दिसत आहे. व्हिडिओ पाहून आपण एवढेच म्हणू शकतो की उर्फीच्या अटकेचे कारण तिचे अपुरे कपडे घालणं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube