Download App

प्रेमभंग, बेरोजगारी की नैराश्य? कुंभमेळ्यातील IIT पासआऊट अभय सिंहची कहाणी

Mahakumbh 2025 ITIian Baba Abhay Singh : महाकुंभात (Mahakumbh) स्नान करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक प्रयागराजमध्ये येत आहेत. महाकुंभासाठी आलेले अनेक अनोखे ऋषी, संत आणि नागा साधू सतत चर्चेत आहेत. परंतु या गर्दीत एका बाबाने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. बोलणं अन् भाषेवरून ही व्यक्ती उच्चशिक्षीत (Mahakumbh 2025) वाटली. तेव्हा उत्सुकतेने अनेकांनी या बाबासोबत संपर्क साधला. त्यावेळी या बाबानी उत्तर देताना म्हटलंय, की हो.. मी आयआयटी बॉम्बेमधून एरोस्पेसमध्ये इंजिनीअरिंग केलंय.

आता या आयआयटीयन बाबाची मुलाखत देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या आयआयटीन बाबाने अनेक धक्कादायक खुलासे ( ITIian Baba Abhay Singh) केलेत. आयआयटीयन बाबाचं खरं नाव ​​अभय सिंग असून त्यांनी आयआयटी मुंबईतून इंजिनीअरिंग केलंय. हे ऐकून अनेकांना धक्काच बसला. प्रत्येकाच्या ओठावर एकच प्रश्न होता की, यशाची शिखरे गाठल्यानंतर संन्यास का घेतला? खुद्द आयआयटीयन बाबा उर्फ ​​अभय सिंहनेच खुलासा केलाय.

केज नगरपालिकेचा कराडला ‘दे धक्का’; पवारांच्या खासदाराने घेतलेल्या हरकतीनंतर प्रमाणपत्र रद्द

आयआयटीयन बाबाचं खरे नाव अभय सिंह आहे. संन्यास घेण्याचे कारण सांगताना अभय म्हणाला की, ही अवस्था सर्वोत्तम आहे. ज्ञानाचा पाठलाग करा, चालत राहा, कुठपर्यंत जाणार? शेवटी इथेच याल. आयआयटीयन बाबाचं जन्मस्थान हरियाणा आहे. परंतु सध्या त्यांचं वास्तव्य अनेक शहरांमध्ये आहेत. आयआयटी मुंबईत 4 वर्षे शिक्षण घेतल्यानंतर त्यांची आवड फोटोग्राफीकडे वळली. 3 इडियट्स या चित्रपटाप्रमाणे त्यालाही अभियांत्रिकीनंतर फोटोग्राफीमध्ये करिअर करायचे होते. या काळात त्यानी 1 वर्ष फिजिक्स कोचिंगचाही अभ्यास केला. आर्ट्समध्ये मास्टर्स केल्यानंतर फोटोग्राफीला सुरुवात केली. पण फोटोग्राफीतही मन रमेना. तेव्हा त्यांनी सर्व काही सोडून संन्यास घेण्याचं ठरवलं.

अध्यात्मासाठी विज्ञान सोडलेले आयआयटीयन बाबा ‘मसानी गोरख बाबा’ म्हणून ओळखला जातोय. त्याने केवळ अभियांत्रिकीचं शिक्षण घेतले नाही तर तत्त्वज्ञान, पोस्टमॉर्टेमिझम आणि सॉक्रेटिस-प्लेटोसारख्या विचारवंतांचा देखील सखोल अभ्यास केलाय. विज्ञान सोडून अध्यात्माकडे वाटचाल करण्याच्या प्रश्नावर आयआयटीयन बाबा म्हणाले की, ही सर्वोत्तम अवस्था आहे. अभियांत्रिकी आणि डिझाइनमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर, जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी मी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. जीवनाचे मूल्य केवळ भौतिक सुखच नाही, तर ज्ञान आणि शांतीचा शोध आहे.

राष्ट्रीय काँग्रेसने ४६ वर्षांनंतर उघडलं नवं मुख्यालय; सोनिया गांधींनी केलं उद्घाटन; काय आहे नवा पत्ता?

प्रेमभंग झाल्यानंतर अभय सिंगने भौतिक सुख सोडून अध्यात्माचा मार्ग स्विकारला, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. तर अनेकजण बेरोजगारीच्या नैराश्याने घेरल्यानं
अध्यात्माकडे वळाल्याचा दावा केला जातोय. परंतु एका वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अभय सिंगला त्याच्या आयुष्यात अनेक गंभीर प्रश्नांचा सामना करावा लागला. तो चिंताग्रस्त आणि निराश झाला. मानसिक आरोग्य, चिंता आणि तणावाशी झुंजत असताना, झोपेच्या समस्या आणि मनाची खोली समजून घेण्यासाठी त्याने मानसशास्त्राचा अभ्यास केला. या काळात तो इस्कॉन आणि कृष्णाच्या विचारांकडे वळला, ज्याने त्याला जीवनाचा अर्थ शोधण्यात मार्गदर्शन केलं. त्यांच्या मते, हा प्रवास आत्म-शोध आणि मानसिक शांती मिळविण्याचे माध्यम बनला. अन् म्हणूनच अभय ‘गोरख मसानी बाबा’ बनला.

 

follow us