Mahakumbh 2025: प्रयागराजमध्ये आजपासून (13 जानेवारी) महाकुंभ (Mahakumbh 2025) सुरू झाला. या महाकुंभात देशभरातून संत आणि महात्मांचे आगमन झालेय. परंतु हरियाणातील आवाहन आखाड्याचे संत गीतानंद गिरी (Geetanand Giri) महाराज भाविकांमध्ये विशेष आकर्षणाचे केंद्र बनलेत. कारण, गीतानंद महाराज आपल्या अंगावर अडीच लाख रुद्राक्ष धारण करतात.
VIDEO : महाकुंभमेळ्यात ‘साध्वी’ने लक्ष वेधलं; सुंदरतेचं कौतुक अन् कमेंटचा वर्षाव…
आवाहन आखाडा हरियाणा शाखेचे सचिव गीतानंद महाराज भक्तांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांनी आपल्या डोक्यावर सव्वा लाखांहून अधिक रुद्राक्ष धारण केले आहेत. गीतानंद जी महाराज त्यांच्या डोक्यावरच नाही तर पूर्ण शरीरावर रुद्राक्ष कवच धारण करतात. त्यामुळं लोक त्यांना रुद्राक्ष बाबा या नावाने देखील ओळखतात. डोक्यापासून पोटापर्यंत त्यांच्या अंगावर अडीच लाख रुद्राक्ष आहेत.
शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला अन् गुंतवणूकदरांना 12 लाख कोटींचे नुकसान
याबाबत बोलतांना महाराज म्हणाले की, २०१९ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यादरम्यान आपण एक अनोखा संकल्प केला होता. १२ वर्षापर्यंत दररोज १.२५ लाख रुद्राक्ष धारण करण्याचा हा संकल्प होता. सध्या आपल्या संकल्पाला फक्त सहा वर्षे झाली आहेत आणि आज अंगावरील रुद्राक्षांची संख्या अडीच लाखांच्या वर पोहोचली आहे. गीतानंद महाराज सांगतात की, या रुद्राक्षांचे वजन ४५ किलोपेक्षा जास्त आहे. महाकुंभमेळ्यात त्यांची हठयोग तपश्चर्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे.
गीतानंद महाराज हे रुद्राक्ष २४ तास घालतात का? या प्रश्नाच्या उत्तर देतांना ते म्हणाले की, नाही, तसं बिल्कुन नाही… आपण हे रुद्राक्ष दिवसातून १२ तास घालतो. सकाळी पाच वाजता रुद्राक्ष धारण केल्यानंतर, संध्याकाळी पाच वाजता ते रुद्राक्ष काढतात. जोपर्यंत रुद्राक्ष शरीरावर असतात, तोपर्यंत आपण अतिशय हलके अन्न ग्रहण करतो आणि तपश्चर्या करतो, असं ते म्हणाले.
जगभरातून आणलेल्या अडीच लाख लहान-मोठ्या रुद्राक्षांच्या मण्यांची माळ डोक्यावर घालणारे गीतानंद यांचा जन्म १९८७ मध्ये पंजाबमध्ये झाला. या जन्मामागेही एक कथा आहे.
कसे बनले संन्यासी?
गीतानंद जी महाराजांनी यांनी सांगितले की आपण एका ब्राह्मण कुटुंबातील आहोत. वडील रेल्वेमध्ये टीटी होते. माझ्या पालकांना मुले होत नव्हती. त्यावेळी गुरु महाराज आमच्या गावात यायचे. त्यांच्या आशीर्वादाने आमच्या पालकांना तीन मुले झाली. पालकांनी मधल्या मुलाला गुरु महाराजांना देण्याचे आधीच ठरवले होतं. मी दुसरं मूल होतो. मी अडीच वर्षांचा असताना, माझ्या आईने मला गुरु महाराजांच्या स्वाधीन केले. तेव्हापासून मी कधीच घरी गेलो नाही. आपलं हायस्कूलपर्यंतचे शिक्षण संस्कृत माध्यमातून झाल्याचंही महाराजांनी सांगितलं.
दरम्यान, हा महाकुंभ 45 दिवस चालणार आहे. 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या शेवटच्या शाही सोहळ्याने (Mahakumbh) महाकुंभाची सांगता होणार आहे.