Mahua Moitra : माझ्याविरोधात कोणताही पुरावा नाही पण मी गौतम अदानींचा मुद्दा उठवला, पुढील काळातही उठवणारच.. माझ्याविरोधात कोणताही रोख स्वरुपातील पुरावा नसल्याचं विधान तृणमुलच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी स्पष्ट केलं आहे. कॅश फॉर क्वेरी प्रकरणी खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.
#WATCH | "This Lok Sabha has also seen the weaponization of a Parliamentary Committee. Ironically, the ethics committee was set up to serve as a moral compass for members. Instead, it has been abused egregiously today to do exactly what it was never meant to do. Which is to… pic.twitter.com/vA6Q2Nt1AT
— ANI (@ANI) December 8, 2023
टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांनी कॅश फॉर क्वेरी प्रकरणात संसदेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मी अदानीचा मुद्दा मांडला होता आणि भविष्यातही मांडत राहीन. कोणत्याही रोख भेटीचा कोणताही पुरावा नाही. विरोधकांची शिफारस केवळ माझ्या पोर्टल लॉगिनर शेअर केलेल्या आधारावर असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतेही नियम नाहीत. समितीलाही अधिकार नसल्याचं मोईत्रा म्हणाल्या आहेत.
Sanjay Raut : सिंचन घोटाळा फेम अजित पवारांना.. ‘त्या’ पत्रावरून राऊतांचा खोचक टोला
पुढे बोलताना मोईत्रा म्हणाल्या, जर मोदी सरकारला असे वाटले असेल की मला गप्प केल्याने अदानी प्रकरण संपुष्टात येईल, तर मी सांगते, तुम्ही केलेली घाई आणि चुकीच्या प्रक्रियेमुळे अदानी तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट होतं. महिला खासदाराला आणखी किती त्रास देणार? असा सवालही मोईत्रा यांनी केला आहे.
वसुंधरा राजेंचा मुलगा दुष्यंतवर आमदारांना घेरल्याचा आरोप; काय म्हणाले समर्थक आमदार?
महुआ मोईत्रा यांना संसद सदस्यत्वावरून हटवण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या सभागृहात सभात्याग केला आहे. लोकसभेत समितीच्या अहवालावर चर्चा होताच टीएमसी खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी महुआ मोईत्रा यांना सभागृहात त्यांची बाजू मांडण्याची परवानगी देण्याची विनंती केली.
महुआ मोईत्रा यांच्याविरोधातील एथिक्स कमिटीच्या अहवालावर लोकसभेत घाईघाईने चर्चा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. हे ‘नैसर्गिक न्याय’ तत्त्वाचे उल्लंघन असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. अहवाल वाचण्यासाठी सदस्यांना तीन-चार दिवसांचा अवधी दिला असता तर ‘आभाळ कोसळले नसते’.