Download App

मोठी दुर्घटना, प्लांटची चिमणी कोसळली, 30 कामगार अडकले

Chhattisgarh Mungeli Accident : छत्तीसगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार छत्तीसगडमधील मुंगेली येथे एका प्लांटची

  • Written By: Last Updated:

Chhattisgarh Mungeli Accident : छत्तीसगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार छत्तीसगडमधील (Chhattisgarh) मुंगेली येथे एका प्लांटची चिमणी कोसळली (Mungeli Accident) आणि 30 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहे. तर या दुर्घटनेत 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. सध्या घटनास्थळी पोलिस आणि प्रशासनाचे पथक बचाव कार्यात गुंतले आहे.

माहितीनुसार, मुंगेलीच्या सारगाव पोलीस स्टेशन हद्दीत ‘कुसुम’ नावाच्या प्लांटमध्ये ही दुर्घटणा घडली आहे. अचानक प्लांटमधील चिमणी कोसळली ज्यामुळे अनेक कामगार यामध्ये जखमी झाले आहे तर 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाकडून सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी काम सुरू आहे आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खरेदी, मनोरंजन व खाद्यपदार्थाची रेलचेल असलेल्या ‘गोदाकाठ महोत्सवास’ 10 जानेवारीपासून होणार सुरुवात

पोलिस प्रशासनाच्या पथकाने ढिगाऱ्याखाली दबलेल्या दोघांना वाचवले आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे. ढिगाऱ्याखाली किती लोक गाडले गेले आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, दररोज सुमारे 400 कामगार प्लांटमध्ये काम करण्यासाठी येतात. अशी माहिती कारखान्याचे मालक आदित्य अग्रवाल यांनी दिली.

मला रिझल्ट ओरिएंटेड काम करयचयं अन् पुढच्या मिनिटाला अजितदादांनी खटका उडवला 

follow us