Download App

Manipur Violence : हिंसाचारामुळे देशाच्या आत्म्याला खोल जखम; सोनिया गांधींचे व्हिडिओच्या माध्यतातून शांततेचं आवाहन

  • Written By: Last Updated:

Sonia Gandhi : गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या (Manipur Violence) घटना घडत आहेत. मेतेई समाजाला (Meitei community) अनुसूचित जमातीचे आरक्षण (reservation) लागू करण्याच्या हालचालींच्या विरोधात एक महिन्यापूर्वी मोठा हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात शेकडो लोकांनी आपला जीव गमवावा लागला होतो. अजूनही हिंसाचाराच्या घटन घडत आहेत. या हिंचारात अनेकांना आपला जीव गमवाला लागत असल्यानं शांततेचं आवाहन केलं जात आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी मणिपूर हिंसाचारा संदर्भात एक व्हिडिओ शेअर केला. याद्वारे त्यांनी मणिपूरच्या जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. (Manipur violence deeply wounded the soul of the country’, Sonia Gandhi shared a video)

https://www.youtube.com/watch?v=BowCJPGZrSo

सोनिया गांधी म्हणाल्या की, मणिपूरमधील अभूतपूर्व हिंसाचारामुळे लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे, या हिंसाचाराने देशाच्या आत्म्यावर खोल जखमा केल्या आहेत. लोकांना त्यांच्या घरातून पळून जाण्यास भाग पाडले गेले हे पाहून मला फारच दुःख झाले. हे फारच त्रासदायक आणि वेदनादायी आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या, मणिपूरचा इतिहास सर्व जाती, धर्म आणि पार्श्वभूमीच्या लोकांना सामावून घेण्याची क्षमता असलेला आहे. मात्र, हिंसाचाराच्या घटना पाहून बंधुभावाची भावना वाढवण्यासाठी अफाट विश्वास आणि सद्भावना आवश्यक आहे. द्वेष आणि विभाजनाची आग पेटवण्यासाठी एक चुकीचं पाऊल पुरेसं आहे. या हिंसाचारामुळे राज्यातील हजारो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. या हिंसाचारात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्वांप्रती माझ्या संवेदना.

शांततापूर्वक जीवन व्यतित करणाऱ्या बहीण-भावांना एकमेकांविरुध्द लढतांना पाहणं हे अतिशय विदीर्ण चित्र आहे. मी मणिपूरच्या लोकांना, विशेषत: माझ्या धाडसी भगिनींना या सुंदर भूमीत शांतता आणि सौहार्दाचा मार्ग मोकळा करण्याचे आवाहन करते. एक आई म्हणून मला तुमची वेदना समजते आणि तुम्ही यातून योग्य मार्ग काढला, अशी मला आशा आहे, असं म्हणत मणिपूरच्या लोकांना शांततेचं आवाहन केलं.

हिंसाचाराची कारणे काय?
मेतेई समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा देण्याच्या मागणीसाठी 3 मे रोजी ‘आदिवासी एकता मार्च’ काढण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच पहाडी भागात संघर्ष झाला होता. त्यानंतर अनेकदा हिंसाचाराची घटना घडल्याचं समोर आलं. आरक्षणावरून ह्या हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. आरक्षणावरून मेतेई आणि कुकी समाजात संघर्ष झाला पेटला असून या संघर्षाने आता हिंसाचाराचे स्वरुप आहे.

Tags

follow us