Download App

Manipur Violence : मणिपूर ‘अशांत’च! राज्य सरकारची मोठी घोषणा

Manipur Violence : तब्बल पाच महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत असलेलं मणिपूर (Manipur Violence) अजूनही शांत झालेलं नाही. येथील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यालाच ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार 19 विशिष्ट पोलीस ठाणे क्षेत्र वगळता संपूर्ण राज्य सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) अंतर्गत मणिपूरमधील संपूर्ण परिसर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अशांत क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

येथील विविध अतिरेकी गटांच्या कारवायांवर नजर ठेवण्यासाठी मणिपूर (Manipur) राज्यात नागरी प्रशासनाच्या मदतीसाठी सशस्त्र दलांचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रशासनाला मदत करण्यासाठी सशस्त्र दलांची गरज असल्याचे राज्यपालांचे मत आहे. यामध्ये राजधानी इंफाळ, लॅम्फेल सिटी, सिंगजामेई, सेकमाई, लामासांग, पटसोई, वांगोई, पोरोम्पट, हिंगांग, लमलाई, इरिलबुंग, लिमाखोंग, थौबल, बिष्णुपूर, नंबोल, मोइरांग, काकचिंग आणि जिरीबाम यांचा समावेश आहे. मात्र, राज्यातील 19 पोलीस ठाणे परिसरात शांतता असून अशा ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मे महिन्यापासून राज्यात मैतेई आणि कुकी समुदायांत संघर्ष सुरू आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही समुदाय आमनेसामने आले आहेत. मागील पाच महिन्यांपासून राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी राज्य सरकारने पुढील सहा महिन्यांसाठी राज्यात निर्बंध लागू केले आहेत. 1 ऑक्टोबरपासून हे निर्बंध लागू होणार आहेत.

विश्लेषण : कचऱ्यातून पैसा! भारताच्या इकॉनॉमीला बूस्टर देणारं Waste Economy नेमकं काय?

या घटनेविरोधात शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून निदर्शने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्री दालनाकडे वाट धरल्याने त्यांना सुरक्षा रक्षकाच्या जवानांनी रोखण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यावेळी दोघांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं. या आंदोलकांना थांबवण्यासाठी सुरक्षा जवानांकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्जही केला आहे. या लाठीचार्जमध्ये काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळाली असून या जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मणिपूर पुन्हा पेटलं; 1 ऑक्टोबरपर्यंत इंटरनेट बंद

महिलांच्या व्हायरल व्हिडीओनंतर आता दोन मुलांच्या मृतदेहाचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या घटनेने पुन्हा एकदा मणिपुरात संघर्ष पेटल्याचं दिसून येत आहे. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मणिपूरमध्ये येत्या 1 ऑक्टोबरपर्यंत इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे.

Anupriya Patel : लग्नाच्या वाढदिवसाला निघाले, केंद्रीय मंत्र्यांच्या पतीचा अपघात

Tags

follow us