Manmohan Singh On Pm Narendra Modi : मी आत्तापर्यंत मोदींसारखा (Pm Narendra Modi) पंतप्रधान पाहिला नसल्याचं म्हणत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan singh) यांनी मोदींवर घणाघात केलायं. दरम्यान, पंजाब लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांनी जनतेला पत्र लिहुन आवाहन केलंय. या पत्रामध्ये मनमोहन सिंग यांनी अग्नीवीर योजना, भाजपचा भ्रष्टाचार, आणि मोदींच्या भाषणांवरुन घणाघात केलायं.
“In the past ten years, the BJP government has left no stone unturned in castigating Punjab, Punjabis and Punjabiyat.
750 farmers, mostly belonging to Punjab, were martyred while incessantly waiting at Delhi borders, for months together. As if the lathis and the rubber bullets… pic.twitter.com/xJZQrsT3f8
— Congress (@INCIndia) May 30, 2024
मनमोहन सिंग पत्रात म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, पंतप्रधान मोदींनी द्वेषपूर्ण भाषणे करुन पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कमी केलीयं. सशस्त्र दलांसाठी चुकीच्या पद्धतीने तयार केलेली अग्निवीर योजना लादल्याबद्दल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने भाजप सरकारवरही टीका केली. भाजपला वाटते की देशभक्ती, शौर्य आणि सेवा केवळ चार वर्षांची आहे. यावरून त्यांचा खोटा राष्ट्रवाद दिसून येत असल्याचंही पत्रात नमूद करण्यात आलंय.
द्वेषपूर्ण भाषणे करणारा पहिलाच पंतप्रधान :
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान होणाऱ्या राजकीय चर्चांवर मी बारकाईने लक्ष ठेवून आहे. मोदींनी अत्यंत द्वेषपूर्ण भाषणे केली असून ही द्वेषपूर्ण भाषणे पूर्णपणे फूट पाडणारी आहेत. सार्वजनिक चर्चेची प्रतिष्ठा कमी करणारे मोदीजी हे पहिले पंतप्रधान आहेत. पंतप्रधान मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठाही कमी केली असल्याचाही घणाघात मनमोहन सिंग यांनी केलायं.
दरम्यान, केवळ काँग्रेसच विकासाभिमुख प्रगतीशील भविष्य सुनिश्चित करू शकते, जिथे लोकशाही आणि संविधानाचे रक्षण केले जाईल, असं आवाहन मनमोहन सिंग यांनी पंजाबच्या मतदारांना पत्राद्वारे केलंय. आजपर्यंत मी कोणत्याही पंतप्रधानांना समाजातील कोणत्याही विशिष्ट वर्गाला किंवा विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी इतके द्वेषपूर्ण, असंसदीय आणि असभ्य शब्द वापरताना पाहिले नाही. मोदींनीही माझ्या नावाने काही खोटी विधाने केली आहेत. मी माझ्या आयुष्यात कधीही एका समाजाला दुसऱ्या समाजापासून वेगळे केले नाही. हा फक्त भाजपचा कॉपीराइट असल्याचंही त्यांनी पत्रात म्हटलंय.