Mircosoft : मायक्रोसॉफ्टने अॅप्पल(Apple) कंपनीला मागे सारत जगातील नंबर एकच महागडी कंपनी ठरली आहे. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अॅप्पलच्या शेअर्समध्ये घसरण होत असल्याचं पाहायला मिळत होतं. मागील काही दिवसांत मायक्रोसॉफ्टने उच्चांक गाठला आहे. मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सच्या किंमतीत चांगलीच वाढ आली असून आता मायक्रोसॉफ्ट ही कंपनी जगातील सर्वात महागडी कंपनी ठरली आहे.
मोठी बातमी! ठाकरे गटाच्या आमदारांना गोगावलेंचा व्हीप लागू असणार; नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं…
मागील काही दिवसांमध्ये वॉशिंग्टन इतली मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या शेअर्समध्ये 1.6 टक्क्यांनी वाढ झाली होती. शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाल्याने मायक्रोसॉफ्ट कंपनीचे बाजार मूल्य 2.875 ट्रिलियन डॉलरवर गेले आहे. त्यानंतर आता कंपनीने मागील काही दिवसांत आर्टिफिशिलय इंटेलिजन्सबाबत आधुनिक तंत्रज्ञानात मोठं पाऊल टाकल्याने गुंतवणूकदारांकडून कंपनीच्या शेअर्सला भलतीच पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळथ आहे.
Apple कंपनीचे 2021 सालापासूनच बाजार मूल्य पहिल्याचवेळी कमी होत असल्याचं दिसून आलं आहे. या कंपनीच्या बाजार मूल्यात 0.9 टक्क्यांनी घसरण झाली आहे. या घसरणीमुळे कंपनीचे बाजार मूल्य 2.871 ट्रिलियन डॉलरवर गेले आहे. या तुलनेत मायक्रोसॉफ्ट कंपनीने वाढीची नोंद झाली आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीने Apple कंपनीला मागे सारत जगातील सर्वात महागडी कंपनी बनली आहे. मात्र, या वाढीबद्दल बोलताना तज्त्रांनी आपलं मत नोंदवल असून ते म्हणाले, ही वाढ काही कालावधीसाठी असू शकते.
MLAs disqualification : आजचा निकाल म्हणजे राजकीय निवाडाच; शरद पवारांची जळजळीत टीका
मायक्रोसॉफ्ट कंपनी Apple कंपनीच्या तुलनेत झपाट्याने पुढे जात आहे. मागील अनेक दिवसांंपासून ही कंपनी नंबर एकची कंपनी बनणार असं सांगितलं जात होतं. अशातच आता मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हे पाऊल कंपनीने उचलल्याने कंपनीला मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचं तज्ज्ञ गील लुरिया म्हणाले आहेत.
दरम्यान, जगभरातील चायनीज बाजारपेठांमधूनही Apple कंपनीला मोठा धक्का बसल्याचं सांगण्यात येत आहे. चीनच्या बाजारपेठेत Apple कंपनीचं महत्व कमी होत असून या कंपनीला रेटिंगही कमी दिलं जात असल्याचं दिसून येत आहे.