Waqf Board Bill : संसदेत वक्फ बोर्डाच्या बिलावरुन (Waqf Board Bill) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु असल्याचं चित्र आहे. सत्ताधाऱ्यांकडून संसदेत वक्फ बोर्ड बिल मांडण्यात आल्यानंतर आज संसदेत त्यावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चेला उत्तर दिलं. अमित शाह यांनी विरोधकांकडून भ्रम केला जात असल्याचं सांगत सडेतोड उत्तर दिलंय. तुम्ही काय धमकावण्याचा प्रयत्न करीत आहात, हा भारत सरकारच्या संसदेचा कायदा आहे सर्वांनाच त्याचा स्विकार करावा लागणार असल्याचं अमित शाहांनी उत्तर दिलंय.
अखेर कुणाल कामराने माफी मागितली पण… समन्स बजावलेल्या प्रेक्षकाला दिली खास ऑफर
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, हा संसेदचा कायदा आहे, सर्वांनाच स्विकारावा लागणार तुम्ही असं कसं बोलू शकता. तुम्ही कायद्याचा स्वीकार नाही करणार हे. हा कायदा भारत सरकारचा आहे प्रत्येकाला तो स्विकारावाच लागणार. आता कोणाचीही जमीन एका घोषणेने वक्फ बोर्डाची होणार नाही आदिवासी बांधव पुरात्तव विभाग आणि सर्वसामान्यांची मालमत्ता सुरक्षित होणार असल्याचा विश्वास यावेळी अमित शाहांनी दिलायं.
तसेच लालूजींनी 2013 च्या संशोधनात म्हटलं की वक्फ बोर्डात लुट झालेली आहे. भविष्यात कडक कायदा करावा लागणार आहे. लालूंची इच्छा तुम्ही नाही पण मोदींनी पूर्ण केली. ज्या नागरिकाची जमीन बळकावली तो आपली तक्रार घेऊन कुठे जाणार. तुम्ही वोट बॅंकेसाठी हे सगळं केलं आम्ही हे संपवत असून आता न्यायालय न्याय करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
पाकिस्तानी कलाकाराचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात! ‘अबीर गुलाल’ला मनसेचा विरोध; ‘सामना आमच्याशी आहे…’
दरम्यान, लोकसभेत वक्फ बोर्डाच्या सुधारणा बिलावरुन चर्चा सुरु आहे. या चर्चेत अमित शाह यांनी सहभाग घेत विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केलीयं. विरोधकांकडून पसरवण्यात आलेल्या समज गैरसमजाबाबत अमित शाह यांनी मुद्देसूद उत्तर दिल्याचं दिसून आलंय. हे बिल कोणत्याही प्रकारचं नूकसानग्रस्त नसल्याचंही अमित शाहांनी यावेळी स्पष्ट केलंय.