Download App

Monkeypox : भारतात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण; केंद्र सरकारकडून राज्यांना मार्गदर्शक सूचना

भारतात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला असून या रुग्णाचे विलगीकरण करण्यात आलं आहे. तर केंद्र सरकारने सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Monkeypox : जगभरात सध्या मंकीपॉक्सचा (Monkeypox) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता भारतातही मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आला असल्याची माहिती समोर आलीयं. विदेशातून भारतात आलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आली आहेत. मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आल्यानंतर केंद्र सरकाकडून सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

भारतात मंकीपॉक्सचा एक रुग्ण आढळून आला असून या रुग्णाचे विलगीकरण करण्यात आले असून त्याला रुग्णालयात ठेवण्यात आलंय. दरम्यान, या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची शोधमोहिम सध्या सुरु असून त्यांचीही तपासणी सुरु आहे. दरम्यान, मंकीपॉक्सचा रुग्ण आढळताच केंद्र सरकारकडून अलर्ट जारी करण्यात आलायं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

मनोज जरांगेंचं सोशल मीडिया रोहित पवारांकडून चालवलं जातं; राजेंद्र राऊतांचा दावा

काय आहेत मार्गदर्शक सूचना?
राज्य आणि जिल्हा स्तरावरील आरोग्य सुविधांचा वरिष्ठ अधिकारी आढावा घेणार आहेत.
संशयित रुग्णांच्या विलगीकरणासाठी रुग्णालयांत सुविधा उपलब्ध करुन देणे.
विशेष व्यवस्थेमध्ये कर्मचाऱ्यांची उपलब्धताही करण्यात यावी.
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडे विशेष लक्ष देण्यात येणार असून मंकीपॉक्सच्या लक्षणानंतर काय केलं पाहिजे याबाबतची माहिती देण्यात यावी.
रुग्णालयात राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेकडून स्क्रीनिंग आणि तपासणीची व्यवस्था असावी.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेकडून मंकीपॉक्सला ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी घोषित केले असून सध्या अनेक देशांमध्ये याची असंख्य प्रकरणे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात देखील अनेक दिवसांपासून प्रशासनाकडून याबद्दल खबरदारी घेतली जात आहे. मात्र भारतात तशी परिस्थिती नाही, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

follow us