Download App

MP Election 2023: मध्यप्रदेशात भाजपची दुसरी यादी जाहीर; केंद्रीय मंत्रीच उतरवले मैदानात

MP Election 2023: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 39 उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भाजपने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनाही विधानसभा निवडणुकीत उतरवले आहे.

दिमानी विधानसभा मतदारसंघातून कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. निवास विधानसभा मतदारसंघातून फग्गनसिंग कुलस्ते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Rohit Pawar : रोहित पवार ‘भावी मुख्यमंत्री’; नगरपाठोपाठ पुण्यातही झळकले बॅनर…

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनाही इंदूर मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि खासदार राकेश सिंह यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनाही उमेदवारी दिली आहे. नरसिंगपूरमधून प्रल्हाद सिंह पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Home Loans Subsidy : मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; होम लोनवर 9 लाख रुपयांपर्यंत सबसिडी

तीन केंद्रीय मंत्री रिंगणात
भाजपच्या 39 उमेदवारांच्या यादीत तीन केंद्रीय मंत्री आणि सहा खासदारांची नावे आहेत. भाजपने माजी प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांना जबलपूर पश्चिममधून उमेदवारी दिली आहे. दरम्यान, सिधीच्या खासदार रीती पाठक यांना सिधी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या छिंदवाडा मतदारसंघातूनही भाजपने उमेदवार जाहीर केला आहे. छिंदवाडा मतदारसंघातून भाजपने विवेक बंटी यांना उमेदवारी दिली आहे.

तीन राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजप यावेळी वेगळी रणनीती अवलंबत आहे. प्रत्यक्षात निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच भाजप उमेदवारांची घोषणा करत आहे. याआधीही भाजपने 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. एकंदरीत, भाजपने आतापर्यंत 78 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

Tags

follow us