Download App

शिवराजसिंह चौहान यांनी सोडला मुख्यमंत्रीपदावरचा दावा, ‘मी कधीही स्पर्धेत नव्हतो’

MP Assembly Election : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत (MP Assembly Election) भाजपच्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh chauhan) यांनी मोठे विधान केले आहे. मी यापूर्वी कधीही मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नव्हतो किंवा आताही नाही, असे म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) मध्यप्रदेशात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हाता. मध्य प्रदेशात 230 सदस्यीय विधानसभेत भाजपला 163 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला 66 आणि भारत आदिवासी पक्षाला एक जागा मिळाली आहे.

चौहान यांनी अधिकृत ‘X’ अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, ‘मी मुख्यमंत्रीपदाचा (पदाचा) दावेदार नव्हतो आणि आजही नाही. पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने भाजपने दिलेले कोणतेही काम मी नेहमीच माझ्या क्षमतेनुसार, प्रामाणिकपणाने आणि समर्पणाने केले आहे. भाजप कार्यकर्ता म्हणून भाग्यवान आहे.’ 64 वर्षीय शिवराज सिंह चौहान हे चार वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

‘भाजप फक्त ‘गौमुत्र राज्यांत’ निवडणूक जिंकतं’; द्रमुकच्या खासदाराने टाकली वादाची ठिणगी

चौहान म्हणाले, मी भाग्यवान आहे की (पंतप्रधान) नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत आणि मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. मोदीजींच्या नेतृत्वाखाली वैभवशाली, समृद्ध आणि शक्तिशाली भारताची निर्मिती होत आहे. मोदीजी हे आमचे नेते आहेत आणि त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला नेहमीच अभिमान आणि आनंद वाटतो. राज्यातील जनतेने भाजपला अभूतपूर्व पाठिंबा दिला आहे, असं म्हणत त्यांनी त्यांनी मतदारांचे आभार मानले.

चेन्नईतील मिचॉन्ग वादळात 24 तास अडकला आमिर खान, असे झाले रेस्क्यू

भोपाळमधील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना चौहान म्हणाले की, मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीला जात नाही’. ते म्हणाले, ‘उद्या मी छिंदवाडा येथे जात आहे, जिथे आम्ही सातपैकी एकही जागा जिंकू शकलो नाही. मध्य प्रदेशातील सर्व 29 लोकसभेच्या जागा जिंकण्याचे भाजपचे ध्येय आहे. नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान करण्याचा संकल्प मी केला आहे.’ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचे गृहक्षेत्र असलेल्या छिंदवाडा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मध्य प्रदेशात 28 जागा जिंकल्या, परंतु कमलनाथ यांचे पुत्र आणि काँग्रेसचे उमेदवार नकुल नाथ छिंदवाडामधून विजयी झाले होते.

Tags

follow us