Murlidhar Mohol get co-operative Minstership: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या एनडीए (NDA) सरकारमधील मंत्रिमंडळाचे खाते वाटप सोमवारी जाहीर झाले. राज्याला दोन कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री व एक स्वंतत्र्य कारभाराचे राज्यमंत्रीपद असे सहा मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यात नितीन गडकरी हे पुन्हा रस्ते विकास व वाहतूक मंत्री झाले आहेत. तर पियूष गोयल हे वाणिज्यमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत. पुण्यातून पहिल्यांदाच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) हे राज्यमंत्री झाले आहेत. त्यांना सहकार व नागरी उड्डाण असे दोन महत्त्वाचे खाते मिळाले आहे.
Nilesh Lanke : … तर संसदच बंद पाडतो, शरद पवारांसमोर निलेश लंकेंचा शब्द
रावेरमधून तिसऱ्यांदा खासदार झालेल्या रक्षा खडसे हाही केंद्रात राज्यमंत्री झाल्या आहेत. त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर रामदास आठवले हे मोदींच्या मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा सामाजिक न्याय मंत्री झाले आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची अपेक्षा होती. त्यांनी अनेकदा बोलवून दाखविले होते. पण त्यांना राज्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले आहेत. तर शिवसेनेचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष आणि आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. या खात्यांचा त्यांच्याकडे स्वतंत्र कारभार असणार आहे.
Breaking News: एनडीएचे खातेवाटप; अमित शाहांकडे गृह, नितीन गडकरींकडे पुन्हा रस्ते वाहतूक
मुरलीधर मोहोळ यांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. खातेवाटपात त्यांना दोन महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाली आहे. केंद्रात सहकार खाते नव्हते. परंतु गेल्या सरकारमध्ये हे खाते निर्माण करण्यात आले. या खात्याची जबाबदारी अमित शाह यांनी स्वतःकडे ठेवले होते. त्यानंतर आताही हे खाते अमित शाह यांच्याकडे आहे. तर या खात्याचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे आहेत.
महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात सहकारी बँका, पतसंस्था, साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आहे. राज्यामध्ये साखर कारखाने, जिल्हा बँकावर अनेक ठिकाणी अजित पवार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. सहकारी कारखाने आहेत. या दोन्ही राष्ट्रवादीचे नेत्यांचे खासगी सहकारी कारखाने आहेत. त्यामुळे एका अर्थाने राज्यातील सहकारी नेत्यांच्या नाड्याही या मोहोळ यांच्या हाती आल्या आहेत.