National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई करत 661 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेच्या ताब्यासाठी नोटीस बजावली आहे. या प्रकरणात लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना आरोपी करण्यात आले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald Case) ईडीने शुक्रवारी तीन ठिकाणी नोटिसा बजावल्या आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील आयटीओ येथील हेराल्ड हाऊस, मुंबईतील वांद्रे परिसरातील कॉम्प्लेक्स आणि लखनऊमधील बिशेश्वर नाथ रोड येथील एजेएल बिल्डिंग येथे ईडीने शुक्रवारी नोटीस बजावल्या आहे. ईडीने या नोटीसमध्ये दिल्ली आणि लखनऊ परिसर रिकामा करण्याची मागणी केली आहे. याबाबात पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीकडे मुंबईतील इमारतीचे भाडे ईडीकडे हस्तांरित करण्याचा पर्याय आहे. असं पीटीआयने वृत्त दिले आहे.
ईडीकडून मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम 8 आणि नियम 5(1) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये ईडीने जप्त केलेल्या आणि न्यायाधिकरणाने (पीएमएलए) पुष्टी केलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया नमूद केली आहे. या स्थावर मालमत्ता ईडीने नोव्हेंबर 2023 मध्ये जप्त केल्या होत्या.
As part of the process to take possession of the tainted properties in the Associated Journals Limited (AJL) money laundering case, the Directorate of Enforcement (ED), in compliance with Section 8 of PMLA, 2002 and Rule 5(1) of the Prevention of Money Laundering (Taking… pic.twitter.com/egM1CnJTsq
— ANI (@ANI) April 12, 2025
नॅशनल हेराल्ड प्रकरण काय?
ईडीचा मनी लाँड्रिंगचा खटला एजेएल आणि तिची होल्डिंग कंपनी यंग इंडियनविरुद्ध आहे. नॅशनल हेराल्ड हे एजेएल द्वारे प्रकाशित केले जाते आणि यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचे आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे यंग इंडियनचे बहुसंख्य भागधारक आहेत, ज्यांच्याकडे प्रत्येकी 38 टक्के शेअर्स आहेत. ईडीने आरोप केला आहे की यंग इंडियन आणि एजेएलच्या मालमत्तेचा वापर 18 कोटी रुपयांच्या बनावट देणग्या, 38 कोटी रुपयांचे बनावट ऍडव्हान्स भाडे आणि 29 कोटी रुपयांच्या बनावट जाहिरातींच्या स्वरूपात गुन्ह्यांसाठी आणखी पैसे कमविण्यासाठी करण्यात आला. असा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.
माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करा, माजी खासदार राजू शेट्टींची मागणी
या प्रकरणात भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत सोनिया आणि राहुल गांधी दोघांवरही ‘गुन्हेगारी गैरव्यवहार’चा आरोप करण्यात आला होता. 2010 मध्ये यंग इंडियनने एजेएलची 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची सर्व मालमत्ता खरेदी केल्यानंतर हा खटला दाखल करण्यात आला होता.