माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करा, माजी खासदार राजू शेट्टींची मागणी

Raju Shetti On Manikrao Kokate : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा.राजू शेट्टी हे गेल्या चार दिवसापासून मराठवाडा आणि विदर्भ दौऱ्यावर आहेत. स्वाभिमानीचे जालना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या शेतकऱ्यांच्या बाबतच्या बेताल वक्तव्याचा राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी समाचार घेतला. माणिकराव कोकाटे सारख्या बोल भांड आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवू नये अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
माध्यमांशी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पुढे म्हणाले की, अजितदादांनी त्यांना समज दिल्यानंतरही त्यांचे बेताल वक्तव्य थांबले नाही. माणिकराव कोकाटे यांनी केंद्रात जाऊन जे आयात शुल्क आता शून्य टक्यावर आणलं ते जर दोन महिन्यापूर्वी आणला असतं तर संपूर्ण कांदा जगाच्या बाजारामध्ये विकला गेला असता. असेही ते म्हणाले. तसेच माणिकराव ठाकरे यांना स्वतःलाही जमत नाही आणि केंद्रालाही जाब विचारण्याची हिंमत नाही. असा टोला देखील त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना लावला. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना शहाणपना शिकवन्यापेक्षा मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा असं देखील ते म्हणाले.
कर्जमाफी सरकारने दिलेला आश्वासन
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी हे सरकारने दिलेला आश्वासन होतं अजित पवार आज म्हणतात की कर्जमाफीसाठी राज्याची आर्थिक परिस्थिती ठीक नाही. सलग अकरा वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अजित पवारांना (Ajit Pawar) निवडणुकीत आश्वासन देताना तिची जाणीव नव्हती का? असा संतप्त सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
राज्य सरकारने एक रकमी एफआरपीचा शासन निर्णय काढला होता तो उच्च न्यायालयाने रद्द केला. त्यामुळे एक रकमी एफआरपी व्याजासह मिळाली पाहिजे. विशेष करून मराठवाड्यातील साखर कारखानदार एक रकमी एफआरपी देण्यास टाळ करत आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील साखर कारखान्यावर एफआरपीसाठी निर्णायक आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
शहांकडून औरंगजेबाच्या कबरीचा ‘समाधी’ म्हणून उल्लेख अन् सुषमा अंधारेंचा पलटवार
ज्या साखर कारखान्यानी अर्धवट एफआरपी दिली आहे. विशेषता मराठवाड्यातील साखर कारखानदार अर्धवट एफआरपी बाबत आघाडीवर आहेत. ही थकीत एफआरपी व्याजासकट वसूल केल्याशिवाय मराठवाड्यातील कारखानदारांना मी सोडणार नसल्याचा इशारा देखील राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.