Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. देशभरात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जागावाटप आणि उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेते रिंगणात उतरले आहेत. तर काही नवखे चेहरेही दिसत आहेत. तसेच काही अशीही मंडळी आहेत ज्यांनी निवडणूक लढण्याचे त्रिशतक गाठले आहे तर कुणी द्विशतक गाठले आहे. काही असेही उमेदवार आहेत ज्यांनी जिंकण्याचे तर काहींनी पराभूत होण्याचेही रेकॉर्ड केले आहे.
आज आपण अशाच काही व्यक्तींची माहिती घेणार आहोत ज्यांना जिकण्यापेक्षा पराभूत होणे जास्त पसंत होते. यामध्ये जोगिंद्र सिंह यांचे नाव आघाडीवर आहे. कारण त्यांना प्रत्येक निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. तरी देखील त्यांनी हार मानली नाही. 300 पेक्षा जास्त निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांना उत्तर भारतात ‘धरतीपकड’ या नावाने ओळखले जाऊ लागले.
Madha Loksabha : मोहिते पाटील अन् शरद पवारांची दिलजमाई; प्रविण गायकवाडांनी सांगितलं A To Z
जोगिंद्र सिंह
जोगिंद्र सिंह यांचा जन्म सन 1918 मध्ये गुजरांवाला (पाकिस्तान) येथे झाला होता. तब्बल 300 वेळा निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी केली. त्यांची प्रचार करण्याची स्टाईल सुद्धा खास होती. प्रचारात ते म्हणायचे मी निवडणुकीत उभा आहे पण, मला मते देऊ नका. 1998 मध्ये त्यांचे निधन झाले.
परमानंद तोलानी
18 पेक्षा जास्त निवडणुकीत परमानंद तोलानी यांचा पराभव झाला होता. तोलानी मध्य प्रदेशातील इंदूरचे रहिवासी आहेत. त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. तोलाणी यांनी 1989 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. तेव्हापासून त्यांचा निवडणूक लढण्याचा सिलसिला कायम आहे. परमानंद यांच्या वडिलांनीही तब्बल 30 वर्षे अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.
Loksabha Election 2024 : हातकणंगलेचा उमेदवार बदलणार? धैर्यशील मानेंनी सांगितली रिअल स्टोरी
पुखराज सोनल
राजस्थानमधील पुखराज सोनल 1993 पासून निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. आतापर्यंत त्यांनी 10 वेळेस निवडणूक लढवली आहे. परंतु प्रत्येक वेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. सन 2004 मध्ये सोनल यांनी जोधपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी केली होती. तर 2008 मध्ये विधानसभा निवडणुकीत सरदारपुरा मतदारसंघातून काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांना टक्कर दिली होती.
के. पद्मराजन
तामिळनाडूमधील टायर रीपेरींगचे दुकान चालवणाऱ्या के. पद्मराजन यांना इलेक्शन किंग या नावाने ओळखले जाते. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी उमेदवारी केली आहे. के. पद्मराजन थोडे थोडके नाही तर तब्बल 238 निवडणुकीत पराभूत झाले आहेत. आता त्यांनी धर्मपुरी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकला आहे. पद्मराजन यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, करुणानिधी, जयललिता आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येदीयुरप्पा यांसारख्या दिग्गज नेत्यांविरोधात निवडणुकीत उमेदवारी केली आहे.