Brijbhushan Sharan Singh Life Story : भारतीय जनता पार्टीचे खासदार ब्रजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) सध्या राजकारणात चर्चेत आहे. महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. तसे पाहिले तर विवाद आणि ब्रजभूषण असे समीकरणच बनले आहे. कारण याआधीही काही वादात अडकले आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आजपासू 19 वर्षांपूर्वी शरणसिंह यांच्या मुलाने आत्महत्या केली होती. त्याने 17 जून 2004 रोजी सकाळी वडिलांच्या घरातच गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांचा मुलगा लखनऊ येथील बाबू बनारसी दास इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी होता. त्याने सुसाइड नोटमध्ये वडिलांना जबाबदार धरले होते.
Modi Government : शेतकऱ्यांना गिफ्ट; खरीप पिकांच्या हमीभाव वाढीला केंद्राची मंजुरी
बृजभूषण यांनी त्यांच्या मुलाच्या खोलीत गोळीबार झाल्याचा आवाज ऐकला. खोलीत पोहोचले त्यावेळी मुलगा ठार झाला होता. त्याने वडिलांच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळी चालवत स्वतःची जीवनयात्रा संपवली. त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये शक्ति सिंह यांची सुसाइड नोट प्रकाशित करण्यात आली होती.
यामध्ये असे म्हटले होते की तुम्ही चांगले पिता म्हणून स्वतःला सिद्ध करू शकला नाहीत. तुम्ही आम्हा भावा बहिणींकडे दुर्लक्ष केले. तुम्ही नेहमीच फक्त तुमचा विचार केला आमची कोणतीच काळजी केली नाही. आमचे भविष्य अंधकारमय दिसत आहे. त्यामुळे आता जगण्याचे काही कारण दिसत नाही.
त्यावेळी बृजभूषण बलरामपूर येथून भाजप खासदार होते. त्यांनी 1998 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. त्यावेळपासून आतापर्यंत सहा वेळेस खासदार राहिले आहेत. बाबरी विध्वसांच्या खटल्यातील 40 आरोपींमध्येही बृजभूषण यांचे नाव होते. या प्रकरणात 30 सप्टेंबर 2020 मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने निकालात सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. बृजभूषण यांना आणखी दोन मुले आहेत.
Video : भर भाषणात मुख्यमंत्री केजरीवालांना अश्रू अनावर; म्हणाले मनीष सिसोदिया लवकरच…
बृजभूषण शरण सिंह 1996 मध्ये टाडा अंतर्गत तिहार कारागृहात बंद होते त्यावेळी त्यांच्या पत्नी केतकी सिंह यांनी गोंडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. त्यांनी काँग्रेस उमेदवार आनंद सिंह यांचा 80 हजार मतांनी पराभव केला होता. सध्या ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. सध्या बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक यांनी सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. पहिलवानांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे.