Download App

अजितदादांची जहरी टीका : पण आता त्यांच्या नाकावर टिच्चून सुप्रियाताई स्वीकारणार संसद महारत्न पुरस्कार

पुणे : “नुसतं उत्तम संसदपटू होऊन प्रश्न सुटत नाहीत” या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या टीकेला 24 तास होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) त्यांच्या नाकावर टिच्चून ‘संसद उत्कृष्ट महारत्न’ पुरस्काराचा स्वीकार करणार आहेत. प्राईम पॉइंट फाउंडेशनमार्फत दिल्या जाणाऱ्या ‘संसद रत्न’ पुरस्कारांचे आज (17 फेब्रुवारी) दिल्लीत वितरण कार्यक्रम होणार आहे. डिसेंबर 2023 मध्ये सतराव्या लोकसभेच्या कामगिरीच्या आधारे सुळे यांना संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार घोषित झाला होता. यापूर्वी त्या एकदा ‘संसद महारत्न’ पुरस्कार तर सातवेळा ‘संसद रत्न’ पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. (NCP (Sharadchandra Pawar) MP Supriya Sule will accept the ‘Sansad Utrishta Maharatna’ award.)

काल बारामतीमध्ये बोलताना अजित पवार यांनी खासदार सुळे यांच्यावर जोरदार टीका केली होती. नुसते व्यक्ती निवडून देऊन, काम न करता संसदेत भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाहीत. भावनिक होऊन काम होत नाहीत. काम करताना तडफेनेच करावी लागतात. जोरकसपणे करावी लागतात. नुसते सेल्फी काढत आपण फिरत नाही. आता मी जर इथे न येता मुंबईत बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इतर काम बघितलीच नसती तर काम झाले असते का? असा सवाल अजित पवार यांनी केला होता. त्यानंतर आज सुप्रिया सुळे संसद महारत्न पुरस्काराचा स्वीकार करणार आहेत.

विधान परिषदेला विसरले, राज्यसभेला डावलले… हर्षवर्धन पाटलांवर आता थेट केंद्रात नवी जबाबदारी

चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना ‘संसद उत्कृष्ट महारत्न’, ‘संसद महारत्न’ आणि संसद रत्न हे पुरस्कार देण्यात येतात. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. दर दहा वर्षांतून एकदा ‘संसद उत्कृष्ट महारत्न’, पाच वर्षांतून एकदा ‘संसद महारत्न’ तर दरवर्षी ‘संसद रत्न’ असे पुरस्कार देण्यात येतात. गत दहा वर्षांमध्ये सुप्रिया सुळे यांनी एकदा संसद उत्कृष्ट महारत्न, एकदा संसद महारत्न आणि सातवेळा संसद रत्न पुरस्कार पटकावला आहे.

नरेंद्र मोदी लबाडांचे सरदार, 2014 मध्ये दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? मल्लिकार्जुन खर्गेंचा सवाल

सध्याच्या सतराव्या लोकसभेत सुळे यांनी पाच डिसेंबर 2023 अखेरपर्यंत 94 टक्के उपस्थिती लावत 231 चर्चासत्रात भाग घेतला आहे. सभागृहात त्यांनी आतापर्यंत 587 प्रश्न विचारले असून 16 खासगी विधेयके मांडली आहेत. याच कामगिरीसाठी सुप्रिया सुळे त्यांना संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. सुळे यांच्यासोबतच मावळचे खासदार श्रीरंग बारणे हेही संसद उत्कृष्ट महारत्न ठरले आहेत. तसेच नंदुरबारच्या खासदार हिना गावित या संसद महारत्न ठरल्या आहेत. याशिवाय कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

follow us