Download App

Neet Exam Scam: तुरुंगातून ‘नीट’ पेपरफुटीचा प्लॅन राबवला; कोण आहे हा मास्टरमाईंड रवी अत्री?

तुरुंगात असतानाही रवी अत्री या व्यक्तीने नीट पेपर लीक प्रकरणात हस्तक्षेप केल्याचं उघड झालं आहे. कोण आहे हा रवी अत्री? आणि काय आहे हे प्रकरण?

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Neet Paper leak Ravi Atri Connection : देशभरा वादळ निर्माण केलेल्या नीट पेपर लिक प्रकरण काही थांबायचं नाव घेत नाही. (Neet) देशातील अनेक राज्यात पेपर फुटीचं पेव फुटलेलं आहे. या प्रकरणावरून विद्यार्थ्यी आक्रमक झाल्याचं चित्र आहे. (Neet Exam Scam) तसंच, विरोधी पक्षांनीही रान उठवलं आहे. त्यामुळे सत्ताधारी एनडीए सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. दरम्यान, नीट पेपर फुटीच्या तपासात रवी अत्रीचं नाव समोर आलं आहे. (Neet Exam) हा रवी अत्री नक्की कोण आहे?. त्याला या प्रकरणाचा मास्टरमाईंड समजलं जातंय.

रवी अत्री नेमका कोण आहे? मराठ्यांनो सावध व्हा! भुजबळ दंगली घडवण्यासाठी लोकांना तयार करतायंत; जरांगे पाटलांचा खळबळजनक आरोप

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात उत्तर प्रदेशातल्या विशेष कृती दलाने रवी अत्रीला मेरठहून अटक केलेली आहे. तो सध्या मेरठ येथे तुरुंगात आहे. पोलीस भरती प्रक्रियेचे पेपर फोडल्या प्रकरणी रवी अत्रीला अटक करण्यात आलेली. २०१५ मध्ये मेडिकलचे पेपर फोडल्याप्रकरणीही त्याच्यावर कारवाई झाली होती. रवी अत्री आणि त्याच्यासह १८ जणांविरोधात मेरठच्या पोलीस भरतीचे पेपर फोडल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पेपरफुटीशी कनेक्शन काय ?
बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने रवी अत्री हा नीट पेपरफुटी प्रकरणात गुंतल्याचे पुरावे शोधले आहेत. संजीव मुखिया हा पेपरफुटी प्रकरणातला माफिया आहे. त्याचे आणि रवी अत्रीचे चांगले संबंध आहेत असंही यामध्ये समोर आलं आहे. तसंच, पोलिसांनी या प्रकरणात तपास केल्यानंतर त्यांना हे समजलं की पेपर फोडण्याचं काम रवी अत्री आणि संजीव मुखिया हे दोघंही करत आहेत.

 तुरुंगात शिक्षा भोगत प्लॅन

बिहारमधील पाटण्याचे साधारण २५ विद्यार्थ्यांना संजीव मुखियाच्या मार्फत फोडलेले पेपर पुरवण्यात आले होते अशीही माहिती समोर आली आहे. रवी अत्रीचं नीट परीक्षेतल्या पेपरफुटीशी थेट कनेक्शन आहे याचेही पुरावे पोलिसांनी शोधले आहेत. तुरुंगात शिक्षा भोगत असूनही त्याने पेपरफुटीसारखा गंभीर गुन्हा कसा राबवला हा गंभीर प्रश्न आता पोलिसांसमोर उभा राहिला आहे.

एकूण संख्या १८ वर दरवेळी संसदेच्या पायऱ्या चढताना जाणीव ठेव; दिल्ली गाजवण्यापूर्वी सुळेंनी सांगितला पवारांचा कानमंत्र

दरम्यान, केंद्रीय शिक्षण विभागाला प्राप्त झालेल्या EOU च्या अहवालात असंही नमूद करण्यात आले आहे की, अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या घरातून जे जळालेले पेपर सापडले होते, त्यावर काही शाळांचे युनिक परीक्षा केंद्रांचे नंबरही होते. EOU ने मूळ कागद आणि त्यातील प्रश्नांशी जळलेल्या प्रश्नपत्रिकेशी जुळवाजुळव करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेची मदत घेतली. EOU अहवालाच्या आधारे शिक्षण मंत्रालयाने शनिवारी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पेपर लीक प्रकरणाशी संबंधित पकडलेल्यांची एकूण संख्या १८ वर पोहोचली आहे.

follow us

वेब स्टोरीज