NEET Exam Scam : नीट परीक्षेच्या (NEET Exam Scam) गोंधळावरून अखेर केंद्र सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (NTA) महासंचालक सुबोध कुमार यांना पदावरून हटविले असून, त्यांची जागी प्रदीप सिंह खरोला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खरोला हे कर्नाटक केडरचे 1985 बॅचचे निवृत्त आयएएसचे अधिकारी आहेत. ते सध्या भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटनेचे सीएमडी आहेत. तर सुबोध कुमार यांच्याकडे कार्मिक व प्रशिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सुजय आपण लढणारे योद्धे, लंकेना असुरी आनंद घेऊ द्या, येत्या निवडणुकीत…; CM शिंदेंची टीका
वैद्यकीय प्रवेश परीक्षचा (NEET) च्या पेपर लीक झाला आहे. तेव्हापासून एनटीए संशयाच्या फेरीत अडकली आहेत. पदावरून हटविलेले सुबोध कुमार हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकी येथून अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतलेली आहे. तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालयातून एमबीएची डिग्री घेतलेली आहे. सुबोध कुमार हे 2009 ते 2018 मध्ये छत्तीसगड सचिव होते. भाजपचे मुख्यमंत्री रमनसिंह यांचे कार्यकाळात ते पदावर होते.
NEET Scam : मोबाईलवर प्रश्नपत्रिका, डॉक्टरांकडून उत्तरे… NEET पेपरफुटीचा मुन्नाभाई पॅटर्न
बिहार पोलिसांचा चौकशी अहवाल शिक्षण विभागाला
नीट पेपर फुटीप्रकरणात बिहारचे कनेक्शन उघडकीस आले होते. त्या प्रकरणाचा तपास बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आला आहे. त्याचा अहवाल बिहार पोलिसांकडून केंद्रीय शिक्षण खात्याला देण्यात आला आहे. त्यानंतर सुबोध कुमारांना पदावरून हटविण्यात आले आहे.