सुजय आपण लढणारे योद्धे, लंकेना असुरी आनंद घेऊ द्या, येत्या निवडणुकीत…; CM शिंदेंची टीका

सुजय आपण लढणारे योद्धे, लंकेना असुरी आनंद घेऊ द्या, येत्या निवडणुकीत…; CM शिंदेंची टीका

Eknath Shinde : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी भापजचे सुजय विखे (Sujay Vikhe) यांचा पराभव केला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी सुजय विखेंनी निवडणुक आयोगाकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली. त्यामुळं लोकसभा निवडणुकीतील पराभव विखेंच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं बोलल्या जातं. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदें (Chief Minister Eknath Shinde) यांनी सुजय विखे यांना धीर दिला.

अक्षय कुमार आणि परेश रावल पुन्हा एकत्र, सरफिराचा दमदार ट्रेलर रिलीज 

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संस्थाचालकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी उमेदवार किशोर दराडे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी बोलतांना शिंदे म्हणाले की, विखे कुटुंबाला सहकाराची मोठी परंपरा आहे. त्यांना (निलेश लंके) तात्पुरता आणि असुरी आनंद घेऊ द्या. येत्या निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार आहे, त्यामुळे सुजय तुम्ही काळजी करू नका, झालं गेलं विसरून जायचं आणि पुन्हा नव्या जोमाने काम करायचं. आपण रडणारे नाहीत, तर आपण लढणारे योद्धे आहोत, पुन्हा लढू आणि जिंकू, असं शब्दात सीएम शिंदेंनी सुजय विखेंना दिलासा दिला.

NEET Scam : मोबाईलवर प्रश्नपत्रिका, डॉक्टरांकडून उत्तरे… NEET पेपरफुटीचा मुन्नाभाई पॅटर्न 

शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीतून आपल्याला आता शिकण्याची वेळ आली आहे. आपल्याबद्दल गैरसमज पसरवले गेले. आणि तो लोकांच्या मनातून काढण्यात अपयशी ठरलो. शिवाय, मोदीद्वेषाने पछाडलेले सर्वजण एकत्र आले होते. तरी मोदीच पुन्हा पंतप्रधान झाले, अस शिंदे म्हणाले.

पराभव स्वीकारायला शिका – लंके
सुजय विखे यांनी निवडणूक निकालावर शंका उपस्थित करत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली. त्यावरून निलेश लंकेंनी सुजय विखे यांच्यावर टीका केली होती. विखे कुटुंबाच हाच इतिहास आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवरबाबत शंका उपस्थित करत लंकेंनी केंद्रीय यंत्रणांवरच आक्षेप घेतला. विखेंनी राजकारणात पराभव स्वीकारायला शिकलं पाहिजे, असंही लंके म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube