अक्षय कुमार आणि परेश रावल पुन्हा एकत्र, सरफिराचा दमदार ट्रेलर रिलीज

अक्षय कुमार आणि परेश रावल पुन्हा एकत्र, सरफिराचा दमदार ट्रेलर रिलीज

Sarfira Movie : नुकतंच सोशल मीडियावर बॉलीवूडचा (Bollywood) खिलाडी कुमार म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) बहुप्रतिक्षित चित्रपट सरफिराचा (Sarfira Movie) दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सध्या या ट्रेलरला सोशल मीडियावर जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे.

सरफिराचा दमदार ट्रेलर यूट्यूबवर ट्रेंडिंगमध्ये आहे. सरफिराच्या पहिल्या पोस्टरने अक्षयच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता निर्माण केली होती त्यामुळे चाहते ट्रेलरची वाट पाहत होते.

या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसह परेश रावल (Paresh Rawal) देखील दिसणार आहे. सरफिराचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर परेश रावल यांनी अक्षय कुमारचा कौतुक करत X वर लिहिले की, सरफिरा अक्षय कुमारचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. यावर अक्षय कुमारने देखील आपली प्रतिक्रिया देत खूप खूप धन्यवाद परेश भाई. तुमच्या उपस्थितीने या चित्रपटात खूप भर पडली आहे. 12 वर्षांनंतर पुन्हा पडद्यावर काम करण्यास खूप मजा आली असं अक्षय कुमार म्हणाला.

यापूर्वी अक्षय कुमार आणि परेश रावल यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. हेरा फेरी आणि हेरा फेरी 2 त्यापैकी काही आहे. आज देखील राजू आणि बाबू राव यांचा वेगळा चाहतावर्ग आहे. याशिवाय अक्षय आणि परेश रावल यांनी मोहरा, वेलकम, भागम भाग आणि गरम मसाला या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

तर 2012 च्या OMG (ओह माय गॉड) नंतर जवळपास 12 वर्षांनी सरफिरामध्ये ते एकत्र दिसणार आहेत. सरफिरा त्याचा २१वा चित्रपट असून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा सरफिरा चित्रपटाचा दिग्दर्शिका राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुधा कोंगारा यांनी केले आहे तर ‘सराफिरा’ हे स्टार्टअप्स आणि एव्हिएशनच्या पार्श्वभूमीवर रचलेले एक चित्रपट आहे. ‘बेबी’, ‘एअरलिफ्ट’ आणि ‘स्पेशल 26’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अक्षयचा सर्वोत्तम अभिनय, अक्षय कुमारचे चाहते त्याच्या धमाकेदार अभिनयासाठी उत्सुक आहेत.

पुढील 5 दिवस सावधान! कोकण, मराठवाड्यासह ‘या’ भागात धो धो पावसाला होणार सुरुवात

सुधा आणि शालिनी उषादेवी या चित्रपटासाठी स्टोरी लिहिली आहे तर पूजा तोलानी आणि जी.व्ही. प्रकाश कुमार यांनी म्युझिक दिला आहे तर सरफिराची निर्मिती अरुणा भाटिया (केप ऑफ गुड फिल्म्स), दक्षिण सुपरस्टार सुरिया आणि ज्योतिका (2डी एंटरटेनमेंट) आणि विक्रम मल्होत्रा ​​(अबंडंटिया एंटरटेनमेंट) यांनी केली आहे. हा चित्रपट 12 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज