Shrikanth साठी राजकुमारचं कौतुक करत अक्षय कुमारने दिला मोलाचा सल्ला…

Shrikanth साठी राजकुमारचं कौतुक करत अक्षय कुमारने दिला मोलाचा सल्ला…

Rajkumar Rao Appreciate by Akshay Kumar for Shrikanth : अभिनेता राजकुमार राव ( Rajkummar Rao ) हा वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याची प्रत्येक नवी भूमिका ही त्याच्या आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी असते. आता त्याचा ‘श्रीकांत’ ( Shrikanth ) हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटातील राजकुमारच्या दमदार अभिनयासाठी अक्षय कुमारने (Akshay Kumar) त्याचं प्रचंड कौतुक केलं. त्याचबरोबर राजकुमारला अक्षयने एक मोलाचा सल्ला देखील दिला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये अमानवीय घटना, चारित्र्यावर संशय असल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगाला होल पाडून कुलूप बसवले

अभिनेता अक्षय कुमारने राजकुमारचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘श्रीकांत’ पाहिला. त्यानंतर अक्षयने या चित्रपटातील राजकुमारच्या दमदार अभिनयासाठी त्याचं प्रचंड कौतुक केलं. त्याचबरोबर अक्षय म्हणाला की, या चित्रपटामध्ये राजकुमारने केलेला अभिनय एवढा दमदार आहे. त्यामुळे आपल्या अभिनयाचे कौशल्य आणि बारकावे त्यांने इतरांना देखील शिकवावे. त्यासाठी त्याने अभिनयाचे क्लासेस सुरू करावेत. असं म्हणत अक्षयने राजकुमारचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

ठाकरेंसोबत राहिल्याने खासदार होणार! शिंदेसोबत असतो तर तिकीटच मिळालं नसत

राजकुमारने साकारलेल्या अंध भूमिकेचं प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक होत आहे. त्याच्या या चित्रपटातील सर्वात पॉवर-पॅक परफॉर्मरने पुन्हा सिद्ध केले आहे की, तो चित्रपट उद्योगातील सर्वात अष्टपैलू कलाकारांपैकी एक आहे. अंध उद्योगपती श्रीकांत बोल्लाच्या भूमिकेत असलेल्या राजकुमार रावच सर्वत्र कौतुक होताना दिसतंय.

अनेकांनी राजकुमार राव ने श्रीकांत उभेऊभ साकारला आहे असं देखील म्हटलं आहे.तुषार हिरानंदानी दिग्दर्शनात राजकुमार राव यांनी उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांची निर्दोष भूमिका साकारणे हे त्यांच्या अतूट अभिनय कौशल्याचा पुरावा आहे. तो आउट-ऑफ-द-बॉक्स आणि मनोरंजक स्क्रिप्टसाठी पहिली पसंती का आहे हे देखील दाखवून जातो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज