ठाकरेंसोबत राहिल्याने खासदार होणार! शिंदेसोबत असतो तर तिकीटच मिळालं नसत

ठाकरेंसोबत राहिल्याने खासदार होणार! शिंदेसोबत असतो तर तिकीटच मिळालं नसत

Sanjay Jadhav Interview : शिवसेनेचं बंड झालं तेव्हा मला ऑफर होती. परंतु, मी त्यांना सांगितल मी आहे त्या घरी सुखी आहे. तुम्ही दिल्या घरी सुखी राहा असं म्हणत आपण ती ऑफर नाकारली असा खुलासा परभणी लोकसभेचे (Parabhani Loksabha) महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी केला. तसंच, 4 जून रोजी मी खासदार होतोय असा दावा करत हे फक्त मुळ शिवसेनेत राहील्यामुळे.  परंतु, मी जर एकनाथ शिंदेंसोबत गेलो असतो तर आज तिकीटच मिळालं नसत. भाजपने दुसर कुणाला पुढ केलं असतं असा दावाही जाधव यांनी केला. ते लेट्सअप मराठीच्या “लेट्सअप चर्चा“या कार्यक्रमात बोलत होते.

 

जरांगे पाटलांनी नाही तर जानकरांनी जातीवाद केला; लेट्सअप चर्चेत जाधव थेटच बोलले

जिंतूर आणि गंगाखेड तालुक्यात सामना तगडा

विकासाच्या मुद्यावर निवडणूक व्हायला पाहिजे होती. परंतु, पंतप्रधानांना कळलं होत मराठवाड्यात विकासाच्या आधारावर मत मिळणार नाहीत त्यामुळे ही निवडणूक भरकटली असंही जाधव म्हणाले. तसंच, परभणी जिल्ह्यात सहा विधानसभा आहेत. त्यामध्ये जिंतूर आणि गंगाखेड तालुक्यात सामना तगडा होईल असंही जाधव म्हणाले.

 

परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला

जितूर आणि गंगाखेड तालुक्यात ओबीसी समाज जास्त असल्याने तिथे काही मागे-पुढे होऊ शकतो. परंतु, येथे एकतरी मत जानकरांपेक्षा जास्त घेत दुसरे मतदारसंघ माझ्यासोबत असल्याने मी किमान एक लाखाने निवडून येईल असा दावाही संजय जाधव यांन यावेळी केला. तसंच, शिवसेनेच्या बंडानंतर मुंबईत खाली-वर झालं, पण परभणी एकमेव जिल्हा आहे जिथ कसलीच फाटाफूट नाही असा वादावी जाधव यांनी केला.

 

लेट्सअप स्पेशल : मराठा समाज भाजपला धक्क्याला लावणार?

खान  आणि बाण

परभणी जिल्ह्यात खान विरूद्ध बाण अशी लढाई सध्या होत नाही. तसंच, गेली काही दिवस झालीही नाही. बाळासाहेब ठाकरे असताना हा मुद्दा समोर येत होता. परंतु, समोर मुस्लीम उमेदवार असताना त्यांनी कीह बोललं तर हिंदू उमेदवारालाही भूमिका घ्यावी लागायची असं म्हणत जिल्ह्यात अशी परिस्थिनी नाही असं मत संजय जाधव यांनी व्यक्त केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज