Arvind Kejriwal Bail : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना निवडणुकांच्या धामधुमीत दिलासा मिळाला. सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.10) केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन दिला. त्यानंतर आज संध्याकाळी अरविंद केजरीवाल तुरुंगाबाहेर आले. केजरीवाल १ जूनपर्यंत तुरुंगाबाहेर राहू शकतात. त्यानंतर मात्र २ जून रोजी त्यांना सरेंडर करावे लागणार आहे. या काळात सुप्रीम कोर्टाने त्यांना काही अटींसह जामीन मंजूर केला आहे. निवडणूक काळात प्रचार करण्यास कोणतीही आडकाठी नाही. परंतु, मुख्यमंत्री कार्यालय आणि दिल्ली सचिवालयात मात्र त्यांना जाता येणार नाही.
मोठी बातमी : केजरीवालांना अखेर अंतरिम जामीन; निवडणुकांच्या धामधुमीत ‘आप’ ला बळ
केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीने आनंद व्यक्त केला. हा सत्याचा विजय आहे असे पक्षाने म्हटले आहे. अन्य पक्षाच्या नेत्यांनीही केजरीवाल यांच्या जामीनावर आनंद व्यक्त केला. यानंतर तिहार तुरुंगाबाहेर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले, फक्त पक्षाचे कार्यकर्तेच नाही तर देशातील लाखो लोक अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेची प्रतिक्षा करत होते.
यापूर्वी मंगळवारी (दि.7) सुनावणी पार पडली होती. त्यावेळी न्यायालायाने निकाल राखून ठेवला होता. तर, दुसरीकडे याच प्रकरणात दिल्ली न्यायालयाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मेपर्यंत वाढ करण्याचे निर्देश दिले होते. तत्पूर्वी ईडीने गुरूवारी (दि.9) प्रतिज्ञापत्र दाखल करून केजरीवालांना अंतरिम जामीन देण्यास जोरदार विरोध केला होता. केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन देणे योग्य होणार नाही, असे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.
दिल्लीत शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; विद्यार्थ्यांना शाळांमधून बाहेर काढलं
दिल्ली दारू धोरणाशी संबंधित समस्या ईडीने स्थानिक 2 तासांच्या नंतर 21 मार्च रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. केजरीवाल यांच्यासह काही नेत्यांवर दिल्ली दारू धोरणाद्वारे काही लोकांना फायदा मिळवून देण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या नावांचा समावेश आहे. याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक करण्यात आली होती.