Download App

ओडिशात भाजपचा ऐतिहासिक विजय, मुख्यमंत्री पदांसाठी ‘हे’ नाव चर्चेत

Odisha New CM : लोकसभा निवडणुकीसह ओडिशामध्ये (Odisha) झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) भाजपने (BJP) ऐतिहासिक

Odisha New CM : लोकसभा निवडणुकीसह ओडिशामध्ये (Odisha) झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) भाजपने (BJP) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर ओडिशामध्ये मुख्यमंत्री (Odisha New CM) कोण होणार याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री पदासाठी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, संबित पात्रासह आणखी काही नावाची चर्चा झाली असून शनिवारी भाजप संसदीय समिती ओडिशाच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करू शकते.

याबाबत आमदार रविनारायण नाईक यांनी सांगितले की, भाजपचे संसदीय मंडळने ओडिशातील भाजपच्या सर्व 20 खासदारांचा सल्ला घेतला असून राज्य विधीमंडळ पक्षाची भुवनेश्वरमध्ये बैठक होणार आहे आणि 10 जून रोजी भाजप सरकारच्या शपथविधी समारंभाच्या आधी नावाची घोषणा केली जाणार असं ते म्हणाले.

तर दुसरीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, माजी केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओरम, नवनिर्वाचित पुरी खासदार संबित पात्रा, राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि केंद्रपारा खासदार बैजयंत पांडा यांच्या नावांची चर्चा सुरु आहे.

10 जून रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला 30 हजारांहून अधिक लोक उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप नेते आणि प्रवक्ते सज्जन शर्मा यांनी दिली आहे. सज्जन शर्मा म्हणाले की, शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी राज्य सरकारने 9 IAS, 01 OFS आणि 40 इतर वरिष्ठ OAS अधिकाऱ्यांसह 50 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

मोदींच्या शपथविधी पूर्वीच शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंना मोठी जबाबदारी, दिसणार नवीन भूमिकेत

विधानसभा निवडणुकीत भाजपने गेल्या 24 वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या बिजू जनता दलाचा पराभव केला आहे. 147 सदस्यीय विधानसभेत भाजपने 78 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे तर बीजेडीला 51 आणि काँग्रेसला 14 जागा मिळाल्या आहेत.

follow us