“भगवान जगन्नाथ पीएम मोदींचे भक्त”; वाद वाढल्यानंतर भाजप नेत्याची माफी, उपवास करणार
Sambit Patra Remark : ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार डॉ. संबित पात्रा वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना माफी मागावी लागली. भगवान जगन्नाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त असल्याचे पात्रा म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पात्रा यांनी अखेर माफी मागितली तसेच पुढील तीन दिवस उपवास करणार असल्याचे पात्रा म्हणाले.
संबित पात्रा यांनी एक व्हिडिओ सोशल मिडिया एक्सवर शेअर केला आहे. आज महाप्रभू श्री जगन्नाथ यांच्याबाबत माझी चूक झाली. यामुळे माझे मन अत्यंत व्यथित झाले आहे. मी महाप्रभू श्री जगन्नाथांच्या चरणी मस्तक झुकवून क्षमा याचना करतो. या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून तीन दिवस उपवास करणार आहे. माझी जीभ घसरली त्यामुळे माझ्याकडून चूक घडली असे पात्रा या व्हिडिओत म्हणत आहेत.
भाजपाचं ऑपरेशन झाडू, केजरीवालांनी सांगितले PM मोदींचे तीन प्लॅन; दिल्लीत हाय होल्टेज ड्रामा!
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी टीका केल्यानंतर पात्रा यांनी स्पष्टीकरण दिले. पुरीमध्ये पीएम मोदी यांच्या रोड शो नंतर मी अनेक प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या दरम्यान मी प्रत्येक ठिकाणी पंतप्रधान मोदी भगवान जगन्नाथांचे भक्त आहेत असेच म्हटले होते. पण एका ठिकाणी चुकून वक्तव्य केले गेले. काही वेळेस बोलताना जीभ घसरते तसे माझ्याबाबतीत झाल्याचे पात्रा म्हणाले.
पात्रा यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सडकून टीका केली. भगवान जगन्नाथ महाप्रभू श्री जगन्नाथ ब्रह्मांडाचे भगवान आहेत. त्यांना एका माणसाचे भक्त म्हणणे हा त्यांचा मोठा अपमान आहे. यामुळे भगवान जगन्नाथांचे करोडो भक्त आणि उडिया जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असे पटनायक म्हणाले होते. यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पात्रा यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली होती.
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, पाकव्याप्त काश्मीर सहा महिन्यांत भारताचा भाग असेल