Download App

महाराष्ट्र दिनी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; गल्लीपासून-दिल्लीपर्यंत LPG सिलिंडर झाले स्वस्त

महागाईच्या वाढत्या आलेखात सर्वसामन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • Written By: Last Updated:

मुंबई : महाराष्ट्र दिनी संपूर्ण देशातील नागरिकांना मोठं गिफ्ट मिळालं असून, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत व्यावसायिक सिलिंडरच्या (LPG Cylinder) किमतीत किमतीत तब्बल 19 रूपयांची मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे महागाईच्या वाढत्या आलेखात सर्वसामन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 19 रुपयांनी कमी केल्या आहेत. मात्र, आज (दि.1) व्यावसायिक सिलिंडरच्या किमतींमध्ये 19 रूपयांची कपात करण्यात आली आहे. पण घरगुती सिंलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (LPG Cylinder Price Update)

आज कपात करण्यात आलेल्या कपातीनंतर  मुंबईतील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी 1,717.50 रुपयांऐवजी आता 1,698.50 रुपये मोजावे लागणार आहेत. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जातो, त्यात सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी केल्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला असून, सिलिंडरच्या किमती कमी झाल्याने बाहेरील खाद्य पदार्थ कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दक्षिण मुंबईनंतर शिंदेंकडून नाशिकही काबीज, लोकसभेसाठी गोडेसेंचं नाव जवळपास निश्चित; आज घोषणा?

यापूर्वी महिला दिनी मिळाली होती गुड न्यूज 

सरकारी तेल कंपन्यांकडून सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. मात्र, घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणतीही कपात  किंवा वाढ करण्यात आलेली नाही. मार्च महिन्यात महिला दिनी केंद्र सरकारने घरगुती सिलिंडरच्या किमती कमी करत देशातील करोडो महिलांना महिलादिनी गुड न्यूज दिली होती. त्यावेळी सरकारने घरगुती सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली होती. याशिवाय मंत्रिमंडळाने 31 मार्च 2025 पर्यंत पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली होती. मात्र, आज (दि.1) व्यावसायिक सिलिंडरच्या किमतींमध्ये 19 रूपयांची कपात करण्यात आली आहे. पण घरगुती सिंलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

follow us