महाराष्ट्रदिनी हेमंत ढोमे यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा! ‘क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam Movie On Maharashtra Day : ‘झिम्मा’, ‘झिम्मा 2’, ‘फसक्लास दाभाडे’ यांसारखे हिट चित्रपट देणारे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी (Hemant Dhome) महाराष्ट्र दिनानिमित्ताने त्यांच्या ‘क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम’ या आगामी चित्रपटाची घोषणा (Maharashtra Din) केली आहे. क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी या निर्मिती संस्थेचा हा पाचवा सिनेमा (Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam) असणार आहे, तर आनंद एल राय यांच्या कलर यल्लो प्रॅाडक्शन सोबत त्यांचा सलग तिसरा चित्रपट असणार आहे.
मराठी शाळांमधील शिक्षणपद्धती, मातृभाषेत शिकण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा चित्रपट (Marathi Movie) मनोरंजन करताना विचार करायला लावणारा ठरेल. शिक्षण क्षेत्रातील बदल, मराठी शाळांची कमी होणारी संख्या आणि मातृभाषेच्या माध्यमातून होणाऱ्या जडणघडणीवर हा चित्रपट प्रकाश टाकणार आहे.
Waves 2025 Summit : सरकार वेव्हज पुरस्कार सुरू करणार, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
हेमंत ढोमे यांनी याआधी ‘झिम्मा’, झिम्मा 2’, ‘फसक्लास दाभाडे’ या गाजलेल्या चित्रपटाद्वारे संवेदनशील विषय मनोरंजनाच्या माध्यमातुन अत्यंत प्रभावीपणे मांडल्या होत्या. आता ‘क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम’ हा एक वेगळा सामाजिक विषय प्रेक्षकांसाठी ते घेऊन येत आहेत.
महाराष्ट्राला पैसे कमी पडणार नाही, मात्र पुण्याला झुकते माप ; अजित पवारांचं मोठं विधान
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “मराठी माध्यमातून मिळालेलं शिक्षण हे माझं बळ ठरलं, अडथळा नाही. मातृभाषेत शिकल्यामुळे मला माझी संस्कृती, परंपरा आणि माणसं समजली आणि याच जडणघडणीचा अभिमान मी जगभर मिरवू शकलो. आपल्या मातीत रुजावं आणि आभाळाला भिडावं!आज मी जो काही आहे, तो माझ्या मराठी शाळांमुळेच आहे. माझे शालेय शिक्षण हे रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी एकूण आठ मराठी शाळांमधून झालं. ज्यात जिल्हा परिषद शाळा देखील होत्या, ज्याचा मला प्रचंड अभिमान आहे. परंतू आजकाल मराठी शाळा बंद पडत आहेत, त्यांची पट संख्या खालावत आहे. ही चिंतेची बाब असून या चित्रपटातून मातृभाषेतील शिक्षण हे कमीपणाचं नसून, खऱ्या अर्थाने समृद्ध करणारं असतं, हे अधोरेखित करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.