Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) लष्कराने मोठी कारवाई करत दिवाळीत हल्ले करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची मोहीम सुरु केली आहे. बांदीपोरा (Bandipora) येथील पनार (Panar) भागात लष्कराने दहशतवाद्यांच्या ठिकाणी हल्ले केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांदीपोरा येथील पनार भागात संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शुक्रवारी संध्याकाळी शोध मोहीम सुरू केली होती मात्र दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. त्यामुळे काही दहशतवादी जंगलात लपून बसले आहेत.
तर आता समोर आलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील (Srinagar) खानयार भागात शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शनिवारी सकाळी खन्यार परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली.
दिवाळी पाडवा, अजितदादा अन् गोल्डन मिठाईची चर्चा, नेमकं काटेवाडीत घडलं तरी काय?
यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले आणि शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू आहे, मात्र अद्याप दोन्ही बाजूंनी कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
राज्यात 12 जागांवर नावांची गुगली; योगायोग की राजकीय डावपेच?