दिवाळी पाडवा, अजितदादा अन् गोल्डन मिठाईची चर्चा, नेमकं काटेवाडीत घडलं तरी काय?

  • Written By: Published:
दिवाळी पाडवा, अजितदादा अन् गोल्डन मिठाईची चर्चा, नेमकं काटेवाडीत घडलं तरी काय?

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज बारामतीमधील काठेवाडी (Kathewadi ) येथे दिवाळी पाडवा (Diwali Padwa) साजरा करत आहे. त्यामुळे राज्यभरातील अनेक कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी काठेवाडी येथे येत आहे. आज सकाळी सात वाजता अजित पवार, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासह मुलगा पार्थ आणि जय पवार काठेवाडी येथे दाखल झाले आहे.

यावेळी अजित पवार यांच्यासाठी एका कार्यकर्त्याने चक्क सोन्याच्या मिठाई आणली. सध्या या मिठाईची चर्चा संपूर्ण राज्यात होत आहे. खास अजित पवार यांच्यासाठी ही मिठाई तयार करण्यात आली आहे. या मिठाईमध्ये 99 टक्के सोन्याचा अर्क आहे. अजित पवार यांच्यासाठी तयार करण्यात आलेलीही मिठाई तयार करण्यासाठी एक आठवडा लागला आणि चितळे बंधु यांच्याकडून ही मिठाई तयार करण्यात आली असल्याची माहिती कार्यकर्त्यांने दिली. तसेच सोन्यासारख्या माणसाला सोन्याची मिठाई आणली आहे. अशी माहिती आबा काळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

तर दुसरीकडे अजित पवार पहिल्यांदा पवार कुटुंबापासून वेगळा दिवाळी पाडवा साजरा करत आहे. त्यामुळे आज सकाळापासून अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी काटेवाडीत पोहोचत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामतीमध्ये पहिल्यांदा अजित पवार कुटुंबापासून वेगळा दिवाळी पाडवा साजरा करत आहे. तर शरद पवार (Sharad Pawar) यांचा गोविंदबागेमध्ये (Govindbage) दिवाळी पाडवा साजरा करण्यात येत आहे. गोविंदबागेमध्ये देखील सकाळपासून शरद पवार यांना भेटीसाठी पदाधीकारी आणि कार्यकर्ते पोहोचत आहे.

देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा अचानक वाढली, बिष्णोई गँग कनेक्शन समोर?

तर दुसरीकडे लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही पुन्हा एकदा बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार अशी लढत पाहायला मिळाली होती. या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube