Download App

भाजप सरकारचा मोठा निर्णय, मदरशांमध्ये Operation Sindoor शिकवले जाणार

Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Attak) बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन

Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Attak) बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील (Pakistan) 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले करत 100  पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार केले होते. तर आता भारतीय लष्कराने चालवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. उत्तराखंड सरकारने मोठा निर्णय घेत मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या अभ्यासक्रमात ऑपरेशन सिंदूरचा समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

उत्तराखंड मदरसा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मुफ्ती शामून कासमी (Mufti Shamoon Qasmi) यांनी याबाबत माहिती दिली. मुफ्ती शामुन कासमी यांनी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांची भेट घेतल्यानंतर याची घोषणा केली आहे.

माध्यमांशी बोलताना मुफ्ती शामून कासमी म्हणाले की, देशाच्या विविध भागातील मुस्लिमांच्या शिष्टमंडळाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या माध्यमातून आम्ही पंतप्रधान मोदींना मेसेज दिले की, आम्ही त्यांच्यासोबत आहे. 140 कोटी लोकांचा देश त्यांच्या मागे उभा आहे.’ यातून प्रेरणा घेऊन, आपल्या मनात आले की आपण एक नवीन उपक्रम का घेऊ नये. आम्ही मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांना आधुनिक शिक्षणाशी जोडले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे एका सैनिकाचे पुत्र आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण एक चांगली सुरुवात करूया, आपल्या मुलांना ऑपरेशन सिंदूरच्या यशोगाथेची जाणीव करून देऊया. असं कासमी म्हणाले.

जरांगे यानेच सगळ्यात जास्त मराठा समाजाचे नुकसान केलं, मंत्रिपदाची शपथ घेताच भुजबळांचा हल्लाबोल

माध्यमांशी बोलताना पुढे मुफ्ती कासमी म्हणाले की, हा निर्णय यासाठी घेण्यात येत आहे की, जेव्हा मुले ही स्ट्रोरी ऐकतील तेव्हा त्यांना पाकिस्तानबाबत माहिती होईळ. 22 एप्रिल रोजी त्याने आमच्या बहिणींसमोर आमच्या निःशस्त्र भावांची हत्या केली. असं ते म्हणाले. तसेच नवीन अध्याय 2025-26  या सत्रापासून शिकवला जाईल. प्राथमिक ते वरिष्ठ माध्यमिक पर्यंतच्या वर्गांमध्ये याचा समावेश केला जाईल. अशी देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.

follow us